अजंगला ट्रॅक्टर पेटविल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 01:00 IST2019-03-18T00:59:05+5:302019-03-18T01:00:08+5:30

मालेगाव तालुक्यातील अजंग येथे शनिवारी अज्ञात समाजकंटकांनी ट्रॅक्टर पेटविल्याची फिर्याद ट्रॅक्टर मालक भरत रामदास अहिरे यांनी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात दिली.

Complaint about the illusion of Ajangala tractor | अजंगला ट्रॅक्टर पेटविल्याची तक्रार

अजंगला ट्रॅक्टर पेटविल्याची तक्रार

मालेगाव : तालुक्यातील अजंग येथे शनिवारी अज्ञात समाजकंटकांनी ट्रॅक्टर पेटविल्याची फिर्याद ट्रॅक्टर मालक भरत रामदास अहिरे यांनी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात दिली.
अजंग येथे भारत अहिरे यांच्या मालकीच्या वीटभट्टीवर त्यांचा महेंद्रा इंटरनॅशनल ४७५ बी. कंपनीचा ट्रॅक्टर उभा होता. रात्री अकरा ते बारा वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने ट्रॅक्टर पेटवून दिल्याने ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले. सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. वडनेर खाकुर्डी पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार शिलावट करीत आहेत.

Web Title: Complaint about the illusion of Ajangala tractor