मुख्यमंत्र्यांबाबत तक्रार नाही : पतंगराव कदम
By Admin | Updated: May 31, 2014 00:22 IST2014-05-31T00:14:55+5:302014-05-31T00:22:56+5:30
नाशिक : देशासह राज्यात कॉँग्रेस आघाडीच्या झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर आपण पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीत जाऊन भेटलो़ मुख्यमंत्र्यांबाबत आपली कसलीही तक्रार नसल्याचा निर्वाळा वनमंत्री पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिला़

मुख्यमंत्र्यांबाबत तक्रार नाही : पतंगराव कदम
नाशिक : देशासह राज्यात कॉँग्रेस आघाडीच्या झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर आपण पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीत जाऊन भेटलो़ मुख्यमंत्र्यांबाबत आपली कसलीही तक्रार नसल्याचा निर्वाळा वनमंत्री पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिला़
नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात वन विभागाच्या अधिकार्यांच्या आढावा बैठकीनंतर कदम पत्रकारांशी बोलत होते़ कदम म्हणाले, निवडणुकीतील पराभव व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यनेतृत्वात बदल संभवत नाही़ मंत्रिमंडळ बदलाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, तो त्यांनी वापरावा़ जे काही होईल ते हायकमांडच्या आदेशाने होईल़ आपण काल दिल्लीला गेलो होतो; परंतु त्यापूर्वी राधाकृष्ण विखेपाटील, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील यांनी सोनिया गांधींची भेट घेतली आहे़ त्यांच्या बैठकीत काय ठरले ते आपणास माहीत नाही़ मुळात दिवस थोडे असल्याने परिणामकारक व गतिमान कामे करण्याचा प्रयत्न आता होणे अपेक्षित आहे़ आपला निवडणुकीबद्दल कोणावरही रोष नाही़ जर निवडणुकीत कोणी काय केले असेल तर याची तपासणी नक्की होईल़ राज्य सहकारी बँकेच्या ऑडिट रिपोर्टबाबत विचारले असता, त्याबाबत आपणास काहीच माहिती नाही़ सहकार कायदा फ ार सक्षम. काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर संपूर्ण संचालक मंडळ यास जबाबदार धरले जाते़ त्यात कोणी दोषी असतील तर त्यांची चौकशी होईल़
कदम यांनी जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी तसेच वन विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करून पुनर्वसन व वन विभागाच्या १०० कोटी वृक्ष लागवडीचा आढावा घेतला़
जे देशात घडले तेच पुण्यात
चिरंजीव विश्वजित कदम यांच्या पराभवाबद्दल पतंगराव कदम यांना विचारले असता ते म्हणाले, जे संपूर्ण देशात झाले तेच पुण्यात झाले़ यामुळे कोणावर रोषही नाही़ विश्वजित कदम यांची उमेदवारी ऐनवेळी जाहीर झाली. आमची तयारी होऊ शकली नाही़ काही चुकीचे आरोपही झाले़ विश्वजित तरुणच असल्याने अजून त्यास खूप दिवस आहेत. त्यामुळे कसलीही चिंता वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले़