नाशिक : अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्यत्वासाठी सर्वच पक्षात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तथापि, भाजप अंतर्गत स्पर्धा सुरू असताना शिवसेनेने यंदा एक जागा वाढवून मिळवण्यासाठी थेट आयुक्तांना पत्र दिले आहे.स्थायी समितीत सोळा सदस्य असतात. त्यातील आठ सदस्य दरवर्षी निवृत्त होतात आणि तितकेच सदस्य पक्षीय तौलनिक बळानुसार पुन्हा समितीत घेतले जातात. यंदा २९ फेब्रुवारीस आठ सदस्य निवृत्त होतील. समितीत भाजपचे नऊ सदस्य आहेत. तथापि, यंदा भाजपच्या शांताबाई हिरे यांचे निधन झाल्याने त्यांचे पक्षीय तौलनिक बळ अल्पसे घटले आहे. अपूर्णाकांतील संख्या ही भाजपपेक्षा शिवसेनेची अधिक असल्याने समितीत भाजपचा एक सदस्य कमी होऊन शिवसेनेचा सदस्य वाढू शकतो. त्यामुळे यंदा त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना देण्यात आलेल्या पत्रात करण्यात आली आहे. गेल्यावर्षीदेखील भाजपच्या एका नगरसेवकाचे निधन झाल्याने हीच संधी साधून शिवसेनेने दावेदारी केली होती. तसेच उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. परंतु त्यावेळी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने आणि युती असल्याने शिवसेनेने हा विषय शेवटी सोडून दिला. त्यातही विभागीय आयुक्तांनी पक्षीय तौलनिक बळानुसार सदस्य नियुक्तीचा चेंडू महासभेकडे टोलावला होता आणि भाजपचे महापौर असल्याने त्याबाबत निर्णय सेनेच्या बाजूने नव्हता. आता दोन्ही पक्षांत सत्तारूढ आणि विरोधक अशी भूमिका असल्याने काय निर्णय होतो याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागून आहे.भाजपमध्ये अंतर्गत वाद वाढण्याची शक्यता आहे. पक्षातील ज्या नगरसेवकांना आजवर कोणतेही पद मिळाले नाही त्यांना संधी मिळावी यासाठी चढाओढ सुरू आहे त्यातच गेल्या वर्षी तीन सदस्यांनी पक्षाने आदेश देऊनही राजीनामे दिले नव्हते त्याची पुनरावृत्ती अन्य सदस्यदेखील करण्याची शक्यता असल्याने तिढा वाढण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीच्या सदस्यत्वासाठी स्पर्धा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 01:29 IST
अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्यत्वासाठी सर्वच पक्षात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तथापि, भाजप अंतर्गत स्पर्धा सुरू असताना शिवसेनेने यंदा एक जागा वाढवून मिळवण्यासाठी थेट आयुक्तांना पत्र दिले आहे.
स्थायी समितीच्या सदस्यत्वासाठी स्पर्धा सुरू
ठळक मुद्देसेनेची दावेदारी : भाजपसमोर मोठी अडचण