शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

कोमॉर्बिड रुग्णांनी अधिक दक्षता घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 21:18 IST

नाशिक  : जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये या आठवड्यात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत बाधित आणि मृत्यूमध्ये सर्वाधिक रुग्ण हे विविध आजारांनी ग्रस्त असलेले कोमाॅर्बिड प्रकारातील आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या रुग्णांनी अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी सांगितले. 

ठळक मुद्देबाधित आणि मृत्यूमध्ये सर्वाधिक रुग्ण कोमाॅर्बिड गर्दी तसेच उत्सवाच्या माहोलचा हा परिणाम

नाशिक  : जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये या आठवड्यात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत बाधित आणि मृत्यूमध्ये सर्वाधिक रुग्ण हे विविध आजारांनी ग्रस्त असलेले कोमाॅर्बिड प्रकारातील आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या रुग्णांनी अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात दिवाळीच्या काळात १६ नोव्हेंबरला अवघ्या १०७ रुग्णसंख्येपर्यंत पोहोचलेला आकडा नोव्हेंबर अखेरीसपासून डिसेंबरच्या प्रारंभीच्या आठवड्यात सातत्याने तीनशे आणि चारशेवर पोहोचू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिड रुग्णांनी अधिक काळजी घेण्याच्या आवश्यकतेवर डॉ. रावखंडे यांनी भर दिला. प्र. रुग्णसंख्या वाढ हा कशाचा परिणाम आहे, असे वाटते ? डॉ. रावखंडे - दिवाळीपर्यंत बाधितांचा आकडा खूप खालच्या पातळीवर आला होता. मात्र, दिवाळीच्या काळात बाजारात झालेली गर्दी तसेच उत्सवाच्या माहोलमुळे सामाजिक अंतराचादेखील विसर पडल्याचाच हा परिणाम आहे. मात्र, निदान यापुढे तरी नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. प्र. जिल्ह्याच्या कोणत्या भागात अधिक रुग्ण वाढत आहेत ? डॉ. रावखंडे - जिल्ह्याच्या सर्व भागांमध्ये रुग्णवाढ दिसून आलेली नसून काही विशिष्ट तालुक्यांमध्येच वाढ दिसत आहे. त्यात नाशिक, निफाड आणि सिन्नर या तालुक्यांतील वाढ सर्वाधिक आहे. तर काही आदिवासी तालुक्यांची वाटचाल शून्याकडे सुरु आहे. त्यामुळे एकीकडे वाढीचे चित्र दिसत असले तरी काही तालुक्यांमध्ये समाधानकारक परिणाम दिसून येत आहे. प्र. नजिकच्या भविष्यात काही विशेष योजना किंवा अभियान राबविण्यात येणार आहे का? डॉ. रावखंडे - जिल्ह्यात सध्या शासनाच्या निर्देशानुसार कुष्ठरोग आणि टीबी रुग्ण शोध अभियान सुरु आहे. त्याचबरोबर कोरोनाचे रुग्ण शोधून काढण्याच्या अभियनालादेखील वेग देण्यात आला आहे. त्यात लक्षणे दिसणाऱ्या आणि जनसमूहाशी संबंधित व्यावसायिकांच्या चाचण्या करण्यावर भर देण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यात ६५ टक्के, जानेवारी महिन्यात ७० टक्के तर फेब्रुवारी महिन्यात ७५ टक्के नागरिकांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल