शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

जागतिकीकरणामुळे शिक्षणाचे व्यावसायिकीकरण : जोंधळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:21 IST

शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे विद्यार्थ्यांना केवळ आवश्यक शिक्षण दिले जात असून, समाजाचा विचार करणारी पिढी निर्माण होण्याची प्रक्रिया थांबली आहे़ आपल्याला सामाजिक व दूरगामी विचार करणारी पिढी निर्माण करावयाची असेल तर चिकित्सक व विश्लेषणात्मक शिक्षण देणाऱ्या संस्था व शाळांची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा़ डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी केले़

नाशिक : शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे विद्यार्थ्यांना केवळ आवश्यक शिक्षण दिले जात असून, समाजाचा विचार करणारी पिढी निर्माण होण्याची प्रक्रिया थांबली आहे़ आपल्याला सामाजिक व दूरगामी विचार करणारी पिढी निर्माण करावयाची असेल तर चिकित्सक व विश्लेषणात्मक शिक्षण देणाऱ्या संस्था व शाळांची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा़ डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी केले़ महात्मा जोतिबा फुले यांच्या १२७ व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित ‘शिक्षणाचे आजचे वर्तमान’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील १७ गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला़जोंधळे पुढे म्हणाले की, देशातील शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल झाले असून शिक्षणाचे अक्षरश: बाजारीकरण झाले आहे़ विद्यार्थ्यांना केवळ आवश्यक शिक्षण दिले जात असल्याने ज्ञानाला फारसे महत्त्व राहिलेले नसून समाजहिताचा विचार करणाºया पिढीची निर्मितीच बंद झाली आहे़ स्वतंत्र विचाराची बुद्धिवंत पिढीच घडत नसल्याने प्रश्न न विचारणारी सध्याची पिढी तयार होत असून ही समाजासाठी घातक बाब आहे़ विशेष म्हणजे शासनाकडून शिक्षणाच्या निधीत कपात केली जात असल्याने शिक्षण खर्चिक होत चालले असून, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची दरी वाढत चालली  आहे़  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते पंढरीनाथ कांबळे (पॅडी) व शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले़  यावेळी जिल्ह्यातील १७ गुणवंत शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला़ यावेळी कवी व साहित्यिक अविनाश जुमडे यांच्या ‘आघात’ या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, समता शिक्षक परिषद समन्वयक चंद्रकांत गायकवाड, नवनाथ  आढाव, विजय जगताप, कळवण तहसीलदार कैलास चावडे, संस्थापक डी. के. आहिरे, जिल्हाध्यक्ष  उत्तम केदारे, सरचिटणीस संजय पगारे, प्रा. गंगाधर अहिरे, सुनील ढाकणे, मनपा शिक्षणाधिकारी उदय देवरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शिक्षकांचा सत्कारशीतल बावणे (कोकणगाव, ता़ निफाड), चंद्रमोहन रामटेके (बोरीचा पाडा, ता़ इगतपुरी), वंदना ओगले (महापालिका शाळा, ता़ नाशिक), संदीप ससाणे (वैष्णवनगर, ता़ नाशिक), नौशाद मन्सुरी (परमोरी, ता़ दिंडोरी), भगवान तवर (वायकंडेवाडी, ता़ चांदवड), अनिल अहिरे (गणोरे, ता़ कळवण), सुनीता बर्वे (घोडेवाडी, ता़ सिन्नर), श्रावण ठाकरे (सोमठाणदेश, ता़ येवला), चंद्रमणी बोबडे (गावठाण, ता़ त्र्यंबकेश्वर), संजीव पवार (पोखरी, ता़ नांदगाव), सुलोचना जाधव (पाटणे, ता़ मालेगाव), शिरीष पवार (खामखेडा, ता़ देवळा), रवींद्र चौरे (तुपविहिरपाडा, ता़ सटाणा), रमेश धिवरे (आंबापाणी, ता़ पेठ), नारायण महाले (चापावाडी, ता़ सुरगाणा), विशेष पुरस्कार : रुमा पवार, संचालक, बुद्धिस्ट स्कूल, आडगाव)

टॅग्स :Nashikनाशिक