प्राथमिक शाळांनाही व्यावसायिक वीजबिल

By Admin | Updated: August 9, 2014 00:50 IST2014-08-08T23:35:55+5:302014-08-09T00:50:02+5:30

प्राथमिक शाळांनाही व्यावसायिक वीजबिल

Commercial Electricity Bills for Primary Schools | प्राथमिक शाळांनाही व्यावसायिक वीजबिल

प्राथमिक शाळांनाही व्यावसायिक वीजबिल

सिन्नर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनाही वीज कंपनीकडून व्यावसायिक वीजबिलाची आकारणी केली जात आहे. प्राथमिक शाळांना घरगुती दराने वीज आकारणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत येथील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश जोशी, शहराध्यक्ष संजय चव्हाणके, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक खुळे, शिवसेना नेते राजाभाऊ वाजे आदींच्या वतीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना सक्तीचे मोफत शिक्षण देत आहे; परंतु सदरच्या शाळांना वीज कंपनीकडूून देण्यात येणारे वीजबिल हे व्यावसायिक आकारणीने दिले जाते आहे. वीज नियामक आयोगाने आॅगस्ट २०१२ पासून परिपत्रक १७५ प्रमाणे ३०० युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या ग्राहकांना घरगुती दराने वीज आकारणी करण्याची अंमलबजावणी करण्याबाबत वीज कंपनीला आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शाळा, वाचनालये व संस्थांही त्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.




त्यामुळे वीज नियामक आयोगाच्या आदेशाप्रमाणे असलेल्या योजनेनुसार तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांना त्याचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा करण्यात यावा, असे आवाहनही ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने पत्राद्वारे करण्यात आले आहे. त्यावर अनिल गायखे, अंबादास वाजे, हेमंत नाईक, सोमनाथ तुपे, बाळासाहेब सानप, सचिन ओझा आदिंची नावे आहेत. (वार्ताहर)

Web Title: Commercial Electricity Bills for Primary Schools