शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या चौकशीला समितीकडून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 01:17 IST

महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी दुपारी ऑक्सिजन भरताना झालेल्या गळतीच्या दुर्घटनेची चाैकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपल्या कामकाजास सुरुवात केली असून गुरुवारी सायंकाळी समितीचे अध्यक्ष व काही सदस्यांनी रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली आहे. येत्या पंधरा दिवसात समितीने आपला अहवाल शासनाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ठळक मुद्देझाकीर हुसेन रुग्णालयाला भेट :  पंधरा दिवसांत शासनाला अहवाल

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी दुपारी ऑक्सिजन भरताना झालेल्या गळतीच्या दुर्घटनेची चाैकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपल्या कामकाजास सुरुवात केली असून गुरुवारी सायंकाळी समितीचे अध्यक्ष व काही सदस्यांनी रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली आहे. येत्या पंधरा दिवसात समितीने आपला अहवाल शासनाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ऑक्सिजन गळतीच्या या दुर्घटनेत २२ कोरोना रुग्णांचा जीव गेला आहे. नाशिक महापालिकेच्या मालकीच्या या रुग्णालयात गेल्या वर्षीपासून कारोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात असून, एक महिन्यापूर्वीच या रुग्णालयात कोरोनाच्या अती गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजनचा प्रकल्प बसविण्यात येऊन त्या माध्यमातून अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आले आहेत. तथापि, बुधवारी दुपारी बारा वाजता प्रत्यक्ष भेटगुरुवारी सायंकाळी चौकशी समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व इतर सदस्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसमवेत झाकीर रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीची पाहणी केली. यावेळी गमे यांनी नेमकी घटना कशी घडली त्याबाबतची माहितीही जाणून घेतली. त्यांच्या पाहणीनंतर प्रसिध्दी माध्यमांनी विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता सदरची भेट ही नियमित असल्याचे सांगून त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, येत्या पंधरा दिवसात त्यांना चौकशी अहवाल शासनाला सादर करायचा आहे.ऑक्सिजनने भरलेल्या टँकरमधून टाकीत ऑक्सिजन भरताना गळती होऊन रूग्णालयात ऑक्सिजनवर व व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन त्यांचा काही क्षणातच मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल शासनाने घेतली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशीचे आदेश दिल्याने बुधवारी घटनेची माहिती घेण्यासाठी आलेले राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समितीची घोषणा केली होती. त्यानुसार समितीने आपले कामकाज सुरु केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRadhakrishna Gameराधाकृष्ण गमे