आदेश बांदेकर यांचा माउली संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:55 IST2019-08-23T00:54:36+5:302019-08-23T00:55:00+5:30

शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांच्या येथील माउली संवाद कार्यक्र मात महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

A commander-in-chief communicates | आदेश बांदेकर यांचा माउली संवाद

आदेश बांदेकर यांचा माउली संवाद

लासलगाव : शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांच्या येथील माउली संवाद कार्यक्र मात महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. आशा कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भात लवकरच खूशखबर दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
आदेश बांदेकर यांनी माउली संवाद कार्यक्र मात गुरु वारी महिलांशी हितगुज करून ग्रामीण भागातील समस्या जाणून घेतल्या. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्र मात महिलांनी कांद्याला हमीभाव मिळावा अशी मागणी लावून धरली. तसेच विंचूर एमआयडीसी मधील उद्योगांत महिलांना प्राधान्याने रोजगार मिळावा अशीही मागणी केली. ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय जिल्ह्यात आणखी काही ठिकाणी बांदेकर यांचे कार्यक्रम झाले. त्यांनाही महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.

Web Title: A commander-in-chief communicates