कमको बँकेचे चेअरमन सुनील महाजन यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2022 02:03 IST2022-07-01T02:02:50+5:302022-07-01T02:03:19+5:30

दि कळवण मर्चंट को-ऑप. बँकेचे चेअरमन व कांदा निर्यातदार व्यापारी सुनील पांडुरंग महाजन (५१) यांचे गुरुवारी (दि.३०) पहाटे मुंबई येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.

Comco Bank Chairman Sunil Mahajan passes away | कमको बँकेचे चेअरमन सुनील महाजन यांचे निधन

कमको बँकेचे चेअरमन सुनील महाजन यांचे निधन

कळवण : दि कळवण मर्चंट को-ऑप. बँकेचे चेअरमन व कांदा निर्यातदार व्यापारी सुनील पांडुरंग महाजन (५१) यांचे गुरुवारी (दि.३०) पहाटे मुंबई येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. निधनाची वार्ता शहरात पसरताच शोककळा पसरली. शहरातील व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण केली.

गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना जडलेल्या अल्पशा आजारामुळे मुंबई येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाली असतांनाच त्यांनी गेल्या आठवड्यात कळवण गावात येत सर्वांची भेट घेतली. मात्र, पुन्हा उपचारासाठी त्यांना मुंबईत नेण्यात आले होते.

 

नूतन स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा, बंधू असा परिवार आहे.

Web Title: Comco Bank Chairman Sunil Mahajan passes away