ठाणगावी पठाण यांच्या पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:19 IST2020-02-24T23:59:03+5:302020-02-25T00:19:52+5:30
ठाणगाव येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने वारीस पठाण याच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्याच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करून त्याच्या पुतळ्याचे दहन केले.

ठाणगावी पठाण यांच्या पुतळ्याचे दहन
सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने वारीस पठाण याच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्याच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करून त्याच्या पुतळ्याचे दहन केले.
भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी छबू कांगणे, सचिन गोळेसर, अक्षय घरटे, रवी नाठे, पांडुरंग पाटोळे, यज्ञेश काळे, प्रमोद शिंदे, रामदास भोर, विनोद आंबेकर, शेखर कर्डीले, राहूल केदार, रतन जगताप, प्रतिक शिंदे, पप्पू बोºहाडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.