बॉलिवूड नाईट्सनी भरले रंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:17 IST2021-02-09T04:17:36+5:302021-02-09T04:17:36+5:30

नाशिक (प्रतिनिधी) : ‘बहारो फुल बरसाओ’ ते ‘जाने कहा गये वो दिन’ यासारख्या सदाबहार गीतांनी रंगलेल्या बॉलिवूड नाईट्सने सुंदर ...

Colors filled with Bollywood Nights! | बॉलिवूड नाईट्सनी भरले रंग !

बॉलिवूड नाईट्सनी भरले रंग !

नाशिक (प्रतिनिधी) : ‘बहारो फुल बरसाओ’ ते ‘जाने कहा गये वो दिन’ यासारख्या सदाबहार गीतांनी रंगलेल्या बॉलिवूड नाईट्सने सुंदर रंग भरले. हिंदी चित्रपट गीतांच्या या सोहळ्याने लोकोत्सवच्या दुसऱ्या दिवसात अनोखी रंगत आणली.

बाबाज् थिएटर्स आणि धर्मवीर युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकोत्सव २०२१’ सांस्कृतिक सोहळ्यात दुसऱ्या दिवशी (दि.८) हिंदी गाण्यांचा सुरेल कार्यक्रम रंगला. पाटेकर ब्रदर्स प्रस्तुत बॉलिवूड हिट्स मैफलीत मोहम्मद रफी, किशोरकुमार, लतादीदी, आशा भोसले अशा दिग्गज कलाकारांनी अजरामर केलेली चित्रपटगीते सादर करण्यात आली. रसिक श्रोत्यांनी त्यावर ताल धरत गाण्यांचा आनंद लुटला. जुन्या हिंदी गीतांच्या या रंगारंग कार्यक्रमात जयंत पाटेकर,उषा पाटेकर, राज तांबट, कस्तुरी वावरे, आदित्य पाटेकर यांनी सुरेल गाणी सादर केली. ‘ए मालिक तेरे बंदे हम’ या प्रार्थनेने प्रारंभ झाला. बहारो फुल बरसाओ, जाने कहा गये वो दिन, ओ मेरे सनम, चिठ्ठी आयी है, रहे ना रहे हम, जिंदगी का सफर या गाण्यांना श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली. विविध वाद्यांची साथसंगत किरण वावरे, अमोल पाळेकर, अभिजित शर्मा, अजय व ओम गायकवाड यांनी केली. उस्मान पटणी यांनी निवेदनात जुन्या काळातील अनेक फिल्मी किस्से सांगून श्रोत्यांचे मनोरंजन केले.

फोटो

०८पीएचएफबी ८८

Web Title: Colors filled with Bollywood Nights!