येवल्यात रंगले डोळ्यांचे पारणे फेडणारे रंगयुद्ध...

By Admin | Updated: March 18, 2017 23:10 IST2017-03-18T23:10:23+5:302017-03-18T23:10:48+5:30

येवला : टिळक मैदान आणि डीजे रोडवरील जमलेल्या जनसमुदायाच्या पिंपांतून परस्परांवर रंगांचा वर्षाव करीत इंद्रधनुष्य अवतरल्याचा अनुभव पाहुण्यांनी घेतला.

Colorful Eyes in Yule | येवल्यात रंगले डोळ्यांचे पारणे फेडणारे रंगयुद्ध...

येवल्यात रंगले डोळ्यांचे पारणे फेडणारे रंगयुद्ध...

येवला : शहरातील टिळक मैदान आणि डीजे रोडवरील जमलेल्या सुमारे सात हजार जनसमुदायाच्या साक्षीने दुतर्फा ट्रॅक्टरांवरील पिंपांतून परस्परांवर रंगांचा वर्षाव करीत दोन्हीही सामन्यात इंद्रधनुष्य अवतरल्याचा अनुभव येवलेकरांसह गावोगावच्या पाहुण्यांनी घेतला.
टिळक मैदानात ट्रॅक्टर समोरासमोर आले अन रंगोत्सवाला सुरुवात झाली. ३० ते ४० ट्रॅक्टरमध्ये रंगांनी भरलेले टीप होते. बादल्यांनी रंग फेकून एकमेकांवर रंगांची उधळण होत होती. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रंगांचा हा सामना अधिकच रंगला. ट्रॅक्टर समोरासमोर आल्यानंतर रंग फेकण्यासाठी प्रत्येक जण तुटून पडला होता. ट्रॅक्टर रिकामा झाला की लगेचच गावाबाहेर शेतकऱ्याकडून ट्रॅक्टरमधील टिपात पाणी भरून रंग बनवून पुन्हा सामन्यात सहभाग घेतला जात होता. तासभर सुरू असलेले हे सामने नवचैतन्याच्या धुंदीतच थांबले; पण नंतरही अंधार पडेपर्यंत रंगाची उधळण सुरूच होती. सर्व जाती-धर्मातील नागरिक या सामन्यात सहभागी झाले होते. श्रीमान शेठ गंगाराम छबिलदास पेढीचे संचालकांनी आपल्या कुटुंबासह परंपरेनुसार बालाजी मंदिरात देवाबरोबर रंग खेळले, तर सायंकाळी सटवाईची मिरवणूकही निघाली होती. (वार्ताहर)

Web Title: Colorful Eyes in Yule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.