चांदोरी येथे आपत्ती व्यपस्थापनाची रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 14:32 IST2018-10-09T14:32:24+5:302018-10-09T14:32:59+5:30
चांदोरी : गोदातिरी आपत्ती व्यपस्थापनाची रंगीत तालीम पार पडली.

चांदोरी येथे आपत्ती व्यपस्थापनाची रंगीत तालीम
चांदोरी : गोदातिरी आपत्ती व्यपस्थापनाची रंगीत तालीम पार पडली. गोदावरीला पावसाळ्यात येणारा पुर व इतर आपत्ती यामुळे जिल्हा आपत्ती व्यपस्थापन समिति व चांदोरी आपत्ती व्यपस्थापन टीम यांच्या सयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबविण्यात आला. एखादी व्यक्ति पाण्यात बुडत असेल किंवा पुरसदृश्य परिस्थिति निर्माण झाल्यास त्या व्यक्तिस कशा प्रकारे वाचवावे. तसेच त्या व्यक्तिच्या शरीरात जर पाणी गेले असेल तर त्या वेळी कशा प्रकारे प्राथमिक उपचार देवू शकतो याचे प्रात्यक्षिक व रंगीत तालीम चांदोरी आपत्ती व्यपस्थापन टीमने करून दाखविली.या वेळी जिल्हा आपत्ती व्यपस्थापन समितीचे प्रशांत वाघमारे यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास १०७७ या टोल फ्री क्र मांकावर फोन करून सांगावे.आपल्याला योग्य वेळेत योग्य मदत मिळेल असे त्यांनी सांगितले. या रंगीत तालिमसाठी रूग्णवाहिका व अग्निशामक दलाचे जवान उपस्थित होते. याप्रसंगी निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, उपसरपंच बापु गडाख, चांदोरीचे पोलिस पाटील अनिल गडाख आपत्ती व्यपस्थापन टीम, चांदोरीचे सागर गडाख, फकीरा धुळे ,संजय गायखे,बाळकृष्ण खालकर, शुभम गारे,शुभम पठाडे, सागर राजोळे,सूरज राजोळे, पिंटु डगळे,संदीप जाधव,विलास सूर्यवंशी, शंकर टोंगारे, किसन बस्ते,नितिन शेटे, वैभव उफाडे, चेतन हिंगमिरे, मधुकर खालकर,ग्रामसेवक कांबळे, अग्निशामक दलाचे हिंगमिरे व विजय चव्हाण व तसेच आदि ग्रामस्थ उपस्थित होते.