शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
3
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
4
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
5
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
6
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
7
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
8
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
9
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
10
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
11
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
12
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
13
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
15
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
16
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
17
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
18
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
19
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
20
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...

ओझर येथे रंगला कुस्त्यांचा फड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 14:09 IST

ओझर : चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कुस्ती स्पर्धेत दत्ताचे शिंगवे येथील नारायण मार्कंड याने दिल्लीच्या सैय्यद दानिश पाशा या चितपट करत अकरा हजारांचे बक्षिस जिंकले.

ओझर : चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कुस्ती स्पर्धेत दत्ताचे शिंगवे येथील नारायण मार्कंड याने दिल्लीच्या सैय्यद दानिश पाशा या चितपट करत अकरा हजारांचे बक्षिस जिंकले. यात्रोत्सवाच्या दुसºया दिवशी पिंप्री रोडवर जिल्हयातील अनेक पहिलवानांनी हजेरी लावली कुस्त्यांना प्रथेप्रमाणे गोडी शेव रेवडयांपासून प्रारंभ झाला. मालेगांव चापडगांव पिंपळनेर ओझर मोहाडी मिठसागरे भगूर लाखलगांव मनमाड अशा अनेक पहिलवानांच्या सहभागाने कुस्त्यांचा फड रंगला. यात्रा समितीने लावलेल्या नारायण मार्कंड ( दत्ताचे शिगवे ) याने अटीतटीची अकराशे रु पयांची कुस्ती जिंकली. त्याने सैय्यद दानिश पाशा दिल्ली याला चितपट केले. अकरा हजार रूपयांची अंतिम कुस्ती पंच यात्रा कमेटी अध्यक्ष धनंजय पगार अशोक शेलार रामू पाटील यांच्या हस्ते शेवटची कुस्ती लावण्यात आली. या अटीतटीच्या व चुरशीच्या कुस्तीत मार्कंड व सैयद शेवटपर्यंत घाम येईपर्यंत एकमेकांवर डाव करित होते. यात्रा कमेटीने चितपट झालीच पाहिजे असा आग्रह धरला शेवटी कुस्ती चितपट झालीच नारायण मार्कंड याचा खंडेराव मंदिरात यात्रा कमेटीच्या हस्ते सत्कार करून अकरा हजार रु पयांचे बक्षिस देण्यात आले.कुस्ती फडाचे व बिक्षस पुकारण्यासाठी सूत्रसंचलन यात्राकमेटी कार्याध्यक्ष रामू पाटील कदम यांनी केले तर पंच म्हणून अध्यक्ष धनंजय पगार, उपाध्यक्ष युवराज शेळके, कार्याध्यक्ष रामू पाटील, राहूल शिंदे,दत्तात्रय घोलप, खजिनदार अशोकराव शेलार, मोतीराम शेळके, रज्जाक मुल्ला, माजी पंचायत समिती सदस्य प्रदिप अहिरे, कांचनराज जाधव, पंडितराव चौधरी, विनोद जाधव, राजेश बर्वे, नवनाथ चौधरी, रविंद्र रंजवे, अविनाश आंबेकर, भारत शेजवळ, पुस्कर जाधव, विक्र म शेजवळ, प्रशांत झोमन आदिंनी काम पाहिले.

टॅग्स :Nashikनाशिक