शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 12:52 AM

मतदान यंत्रांविषयी असलेली शंका तसेच काही प्रश्न असतील तर त्यांचे समाधान व्हावे यासाठी राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत मंगळवार (दि.३) पासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र कार्यप्रणालीची रंगीत तालीम करण्यात येणार आहे.

नाशिक : मतदान यंत्रांविषयी असलेली शंका तसेच काही प्रश्न असतील तर त्यांचे समाधान व्हावे यासाठी राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत मंगळवार (दि.३) पासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र कार्यप्रणालीची रंगीत तालीम करण्यात येणार आहे. सदर यंत्रांची कार्यपद्धती, अचूक क्रिया आणि योग्य मतदान पडते किंवा नाही याची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची संधी राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना या रंगीत तालीमप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.मतदान ज्या यंत्राच्या साह्याने केले जाते त्या यंत्रणेविषयी काही राजकीय पक्षांनी शंका उपस्थित केली असून, देशभरात याविषयीचे अनेक मतप्रवाह निर्माण झालेले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर तर ईव्हीएमविषयी अधिक संशय व्यक्त करण्यात आल्यामुळे मोठे राजकीय वादळही उठले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्टÑात विधानसभा निवडणूक होत असून, सदर निवडणूक पारदर्शक पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक विभागाला सूचना केलेल्या असून, त्यानुसार राजकीय पक्षांना यंत्राची कार्यपद्धती पडताळण्याची संधी निवडणुकीपूर्वी मिळणार आहे.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाने संपूर्ण तयारी केली असून, निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या सुमारे २१ हजार यंत्रांची पडताळणीदेखील पूर्ण करण्यात आलेली आहे. निवडणुकीसाठी प्राप्त झालेले ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन या अंबड येथील सेंट्रल वेअर हाऊस गुदामात ठेवण्यात आलेल्या असून मंगळवारी सकाळी ११ वाजता या ठिकाणी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोरच या यंत्रांची रंगीत तालीम घेतली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या यंत्रांविषयीचा गैरसमज दूर करण्यासाठी सदर उपक्रम असल्याने राजकीय पक्ष नेत्यांनी संबंधित ठिकाणी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. सदर रंगीत तालीम ही मंगळवारपासून पाच दिवस सुरू राहणार आहे.आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उपयोगात येणाºया इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स आणि व्हीव्हीपॅट यंत्रांवरील अभिरूप मतदान अर्थात मॉक पोली प्रक्रियेसाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी व त्यांच्या जबाबदार प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स व व्हीव्हीपॅट यंत्राबद्दलच्या आपल्या सर्व शंकांचे निरसन करून घ्यावे- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयEVM Machineएव्हीएम मशीन