बाल वारकऱ्यांचा रंगला रिंगण सोहळा
By Admin | Updated: July 4, 2017 23:43 IST2017-07-04T22:55:29+5:302017-07-04T23:43:42+5:30
नाशिक : जिल्ह्यातील शाळामंध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

बाल वारकऱ्यांचा रंगला रिंगण सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील शाळामंध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने बाल वारकऱ्यांनी शहर व गावातून दिंडी काढली. सिन्नरला एस. जी. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा अमाप उत्साहात पार पडला. विठूरायाच्या गजरात व भक्तीमय वातावरणात तालुका दुमदुमून गेला होता.
सिन्नर : येथील एस. जी. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. भगव्या पताकांनी सजलेला शाळेचे संपूर्ण आवार विठ्ठल-रखुमाईच्या नामजपासह टाळ-मृदंगाच्या गजराने भक्तिमय बनले होते.
माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, उपाध्यक्ष दौलत मोगल, सचिव राजेश गडाख, माध्यमिकचे मुख्याध्यापक रघुनाथ एरंडे, प्राथमिकचे मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडीला सुरुवात झाली. शेवटी मैदानात भव्य असे गोल रिंगण घालून विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही भक्तिभावात रंगून गेले होते. विद्यार्थ्यांनी विठूनामाच्या गजराने परिसर दणाणून सोडला.
जयश्री सोनजे, सुधाकर कोकाटे, सागर भालेराव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनायक काकुळते, बापू चतुर, पांडुरंग लोहकरे, जिजा ताडगे, वृषाली जाधव, गणेश सुके, मंदा नागरे, योगेश चव्हाणके, प्रमोद महाजन, संदीप गडाख, शिवाजी कांदळकर, शिवाजी गाडेकर, माधव शिंदे, बाळासाहेब काळोखे, विलास सातपुते, संजीवनी गजभार, सुधाकर पाटने यांनी परिश्रम घेतले.
अभिनव व आदर्श शाळा
मराठा विद्या प्रसारक संचलित अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविहार ज्ञानसंकुलात आषाढी एकादशीनिमित्ताने पालखी दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापक श्रीमती एस. आर. आव्हाड व सुरेखा सोनवणे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडीस प्रारंभ झाला. टाळ-मृदंगाच्या गजरात, विविध भजने गात दिंडी काढण्यात आली. याप्रसंगी बाळकृष्ण बदादे, संजीव गांगुर्डे, संतोष जगताप, सुजोत कुमावत, संगीता गाडे, सविता दवंगे, नितेश दातीर, विलास हांडगे, रवींद्र बुचकूल, ज्योती शिंदे, सरला गिते, शर्मिला देवरे, मच्छिंद्र गोहाड, संगीता जाधव, संगीता शिंदे, कविता पवार, अर्चना काशिद, वैभव केदार, अर्चना खालकर, वंदना मते, विकास सावंत, गणपत नवले, अभिमन्यू बोडके, योगेश घुले, महेश नवले, कावेरी देशमुख, प्रतिभा जाधव आदी उपस्थित
होते.