शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कॉलेज रोड बनला ‘बाईक रायडींग’चा आखाडा

By admin | Published: July 10, 2014 10:21 PM

कॉलेज रोड बनला ‘बाईक रायडींग’चा आखाडा

 नाशिक - लायसन्स नाही, सिग्नल तोडला, वाहन चालविताना मोबाईलवर बोलत होते अशा एक ना अनेक कारणांमुळे सर्वसामान्यांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. किंबहुना शहरातून वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन केले की, कारवाई ठरलेलीच. नो पार्किंग, एकेरी मार्गावरून वाहतूक, वाहन चालविण्याचा परवाना यासोबतच शहरामध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांची वेग मर्यादाही ठरविण्यात आली आहे. पण कॉलेजरोड परिसरात कॉलेजकुमार वेग मर्यादेचे बिनधास्त उल्लंघन करीत धूम स्टाइलने दुचाकी पळवत असल्याने वाटसरूंना जीव मुठीत घेऊन या परिसरात वावरावे लागत आहे. सध्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन प्रक्रिया सुरू असल्याने तरुण-तरुणींची दिवसभर या परिसरात रेलचेल असल्याने काही टवाळखोर मुलींना इम्प्रेस करण्यासाठी सुसाट गाड्या पळवित आहेत. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोरच घडत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या कॉलेजरोड परिसरात अकरावी प्रवेशाची लगबग असल्याने पालकही आपल्या पाल्यांसमवेत येत आहेत. परंतु अशाप्रकारे दुचाकी पळविल्या जात असल्याने पालकांनाही धडकी भरत आहे. स्पोर्टस बाइकची क्रेझशहरात दररोज विक्र ी होणाऱ्या इतर दुचाकीच्या तुलनेत स्पोर्टस बाइकचा आकडा वाढत आहे. कॉलेज तरूणांची पसंती असलेल्या या स्पोर्टस बाइक सुसाटपणे पळविल्या जात असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या काळजात एकच धडकी भरत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर हे प्रमाण अधिकच वाढले असून, अशा टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. बाइकवरून मुलींची छेडघरातून बाहेर पडल्यापासून टवाळखोरांच्या उपद्रवाला तोंड देत, टोमणे ऐकत आणि धक्के खात मुलींचा प्रवास सुरू असतो. स्वत:च्या बाइकवर कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींचे दु:ख आणखीच वेगळे आहे. धूम स्टाइल रायिडंग साठी मुळातच नाशिकचा कॉलेज रोड बदनाम झाला आहे. एकाच वेळी दहा-वीस जण अतिशय वेगात गाड्या उडवित जात असताना रस्त्यावरच्या सगळ्यांच्याच काळजाचा थरकाप उडतो. त्यातच अशा टवाळखोरांच्या घोळक्यांतून वाट काढत जाणाऱ्या मुलीवर तर बिकट प्रसंग ओढावतो. मुलीला वाहनांच्या गराड्यात घेऊन, घाबरवून सोडण्यात या टवाळखोरांना आसुरी आनंद मिळतो. जोरात गाडी चालवून आधी ओव्हरटेक करायचे, मग अचानक मोठा ब्रेक लावून मागून येणाऱ्या तरु णीला घाबरविण्याचे प्रकार सर्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.