कंटेनरच्या धडकेत महाविद्यालयीन तरूणी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 16:04 IST2019-12-14T16:04:26+5:302019-12-14T16:04:36+5:30
पाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील देर्डे येथे झालेल्या कंटेनर व दुचाकी अपघातात सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील महाविद्यालयीन तरूणी ठार झाल्याची घटना शनिवार (दि.१४) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.

कंटेनरच्या धडकेत महाविद्यालयीन तरूणी ठार
पाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील देर्डे येथे झालेल्या कंटेनर व दुचाकी अपघातात सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील महाविद्यालयीन तरूणी ठार झाल्याची घटना शनिवार (दि.१४) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. किरण संतोष गडाख असे मृत महाविद्यालयीन तरूणीचे नाव आहे. दरम्यान किरण मामा विकास नवनाथ निरगुडे रा. पाथरे ता. सिन्नर यांचे सोबत दुचाकीवरून कोपरगाव येथील संजीवनी पॉलिटेक्निक येथे जात होती. कोपरगाव तालचक्यातील देर्डे येथे भरधाव कंटेनरने पुढे चालणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात किरण ठार झाली. तर निरगुडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून कोपरगाव येथे त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे. निरगुडे हे संजीवनी पॉलिटेक्निक या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला असून किरण अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकत होती. तिचे मूळ गाव तालुक्यातील देवपूर असून वडिलांच्या निधनानतंर दहावीपासून ती मामांकडे शिक्षणासाठी होती. मयत किरणच्या पाठीमागे आई, दोन लहान बहिणी असा परिवार आहे. अभ्यासात हुशार असणाºया व वडिलांचे छत्र हरपलेल्या किरणच्या अपघाती मृत्यूमुळे पाथरे व देवपूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.