सिव्हिलमध्ये प्रत्येक गुरुवारी जिल्हाधिकारी घेणार आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 01:35 IST2021-05-17T01:34:48+5:302021-05-17T01:35:13+5:30

जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण कमी होत असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात प्रत्येक गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा बैठक घेतली जाणार आहे.

The Collector will take stock every Thursday in Civil | सिव्हिलमध्ये प्रत्येक गुरुवारी जिल्हाधिकारी घेणार आढावा

सिव्हिलमध्ये प्रत्येक गुरुवारी जिल्हाधिकारी घेणार आढावा

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण कमी होत असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात प्रत्येक गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा बैठक घेतली जाणार आहे. या आढावा बैठकीत प्रामुख्याने आतापर्यंत करण्यात आलेली कामे तसेच पुढील टप्प्याच्या नियोजनावर भर देण्यात येणार आहे. पहिल्या लाटेनंतर यंत्रणेत आलेली काहीशी शिथिलता दुसऱ्या लाटेनंतर दिसू नये यासाठी आतापासूनच सर्व प्रकारच्या तयारीचा आणि सज्जतेचा आढावा घेतला जाणार आहे.

Web Title: The Collector will take stock every Thursday in Civil