नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्यानात असलेले पुरातन गुलमोहराचे झाड शासकीय सुटीच्या दिवशी गुपचूप तोडण्यात आल्याची बाब ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने सदरचे झाड उन्मळून पडल्यामुळे तोडण्यात आल्याचा खुलासा केला तर महापालिकेच्या उद्यान विभागानेही झाड धोकादायक असल्यामुळे तोडण्यात आले, त्यात परवानगी घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचा दावा केला. जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेने संगनमताने ज्या गुलमोहराच्या झाडाची कत्तल केली त्याची वस्तुस्थिती पाहता, झाडाची एक बाजू कलंडल्यामुळे ते कापण्यास कोणाची हरकत नसावी परंतु त्याच झाडाची दुसरी बाजू भक्कम व त्याचा बुंधा जमिनीत घट्ट रुतलेला असतानाही या झाडाची संपूर्ण कत्तल करण्यात आली. झाड अशा पद्धतीने कापण्यात आले की परत त्याला पालवी फुटून त्याने उभारी घेऊ नये याची काळजी घेण्यात आली. याच झाडाला लागून आंब्याचे दोन वृक्ष धडधाकटपणे उभे असताना व ते नजीकच्या काळात उन्मळून पडण्याची कोणतीही शक्यता नसताना या झाडावरही झडप घालण्यात आली आहे.कत्तलीमागचे षडयंत्रएकी झाडाची मधोमध कत्तल करण्यात आली असून, दुसऱ्या झाडाच्या साली कुºहाडीचे छाटण्याचे कृत्य करण्यात आले आहे. जेणेकरून गुलमोहराच्या झाडाप्रमाणे या झाडांचेही आयुष्य कमी करण्याचा प्रताप दोन्ही यंत्रणांनी केला आहे. त्याबाबत मात्र कोणताही खुलासा न करता सोयीस्कर मौन पाळण्यात आल्यामुळे गुलमोहराच्या झाडाच्या कत्तलीमागचे षडयंत्र लपून राहिलेले नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बेकायदा वृक्षतोडीची पाठराखण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:25 IST