जिल्हाधिकाऱ्यांनी कासार यांना बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:16 IST2021-09-18T04:16:40+5:302021-09-18T04:16:40+5:30
संबंधित महिला तलाठीने आपणाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांच्या मागणीची दखल न घेतल्याने त्यांना मॅट न्यायालयात ...

जिल्हाधिकाऱ्यांनी कासार यांना बजावली नोटीस
संबंधित महिला तलाठीने आपणाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांच्या मागणीची दखल न घेतल्याने त्यांना मॅट न्यायालयात धाव घ्यावी लागली होती तर संबंधित प्रांतधिकारी प्रांताधिकारी सोपान कासार यांच्यावर पोलिस ठाण्यात विनयभंग तसेच, दमदाटी करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
बदलीस पात्र नसतानाही कासार यांनी ज्येष्ठतेचे नियम डावलून येवला येथील महिला तलाठीची नांदगाव तालुक्यात बदली केली होती. ही बदली रद्द करण्याच्या बहाण्याने प्रांतधिकारी कासार यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप पीडित तलाठी महिलेने केला होता. याबाबतची तक्रार विशाखा समितीकडे करण्यात आली होती तर अन्यायकारक बदलीसाठी त्यांनी मॅटमध्येदेखील धाव घेतली होती. मॅटने त्यांंच्या बदलीला आगोदर स्थगिती दिली आणि त्यानंतर बदली रद्द करण्याचा निर्णय दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. तर आता विशाखा समितीनेदेखील महिला तलाठ्यावर अन्याय झाल्याचे तसेच त्यांना मानसिक त्रास झाल्याचे निष्पन्न झाल्याचे म्हटले आहे.
विशाखा समितीने प्रांतधिकारी सोपान कासार यांच्यावर कारवाईची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कासारा यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
प्रातांधिकारी कासार यांच्यावर महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात विशाखा समितीच्या चौकशीत कासार दोषी आढळले असून त्यांच्यावर
कारवाई करण्याच्या सूचना समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या अहवालात केल्या
आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कासार यांच्याकडून तात्काळ खुलासा मागवला आहे. प्रांताधिकारी सोपान कासार यांच्यावर महिला
तलाठ्याच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात विनयभंग तसेच, दमदाटी करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. बदलीस पात्र नसतानाही
कासार यांनी ज्येष्ठतेचे नियम डावलून नांदगाव तालुक्यात बदली केल्याचा आरोप करून या अन्यायकारक बदलीविरोधात पीडित महिलेने मॅटमध्ये धाव घेतली होती. त्यास २३ ऑगस्टपर्यंत मॅटने स्थगिती दिली होतीे. याच दरम्यान या महिलेने
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडेही तक्रार केली होती. येवला पोलिस ठाण्यात प्रारंभी गुन्हा दाखल करत नसल्याने या महिलेने थेट भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना संपर्क साधला होता. त्यांनतर सूत्रे
हलली व कासार यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. नंतर या महिलेसह इतर कर्मचारी महिलांनी देखील कासार यांच्याबाबतीत तक्रारी दिल्या
होत्या. त्यामुळे जिल्हाधिकारी मांढरे यांनी लैंगिक शोषण अत्याचार समितीद्वारे चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सदर समितीने उपजिल्हाधिकारी कासार यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.