येवल्यात सामूहिक तुळसी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:50 IST2017-11-05T23:49:53+5:302017-11-05T23:50:38+5:30

 येवला : लक्षीनारायण मित्रमंडळाच्या वतीने सामूहिक तुळसी विवाह उत्साहात संपन्न झाला. येथील तीन देऊळ परिसरातील लक्ष्मीनारायण मित्रमंडळाच्या वतीने सामूहिक तुळसी विवाह उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

 Collective Tulsi wedding in Yeola | येवल्यात सामूहिक तुळसी विवाह

येवल्यात सामूहिक तुळसी विवाह

 येवला : लक्षीनारायण मित्रमंडळाच्या वतीने सामूहिक तुळसी विवाह उत्साहात संपन्न झाला. येथील तीन देऊळ परिसरातील लक्ष्मीनारायण मित्रमंडळाच्या वतीने सामूहिक तुळसी विवाह उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शहर व ग्रामीण भागात ज्यावेळी तुळशी विवाह संपन्न होतात त्यानंतरच विवाह समारंभाना सुरु वात होते अशी परंपरा आहे.यावेळी लक्ष्मीनारायण मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन तुळशी विवाहाचे आमंत्रण देत चक्क तुळशी विवाहप्रसंगी फेटे परिधान करत नाचत- गाजत फटाक्यांच्या आतषबाजीने वरात काढून मंगलाष्टके होऊन शेकडो भाविकांच्या उपस्थितीत थाटात तुळशी विवाह पार पाडला.यावेळी अभिषेक, महापूजा, आरती, भजन आदी कार्यक्र म झाले. सकाळपासून तीन देऊळ येथे तुळशी विवाहाची धामधूम सुरू होती तुळशी भोवती आकर्षक सजावट आण ि भाविकांच्या गर्दीने तीन देऊळ मंदिर गजबजून गेले होते. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्र म झाला.

Web Title:  Collective Tulsi wedding in Yeola