सामूहिक रजा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:29 IST2017-08-11T00:28:41+5:302017-08-11T00:29:03+5:30

जिल्ह्यातील सिन्नर व दिंडोरी नगरपालिका कर्मचाºयांनी बुधवारी एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन केले. नगरपालिका कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास २१ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Collective leave movement | सामूहिक रजा आंदोलन

सामूहिक रजा आंदोलन

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर व दिंडोरी नगरपालिका कर्मचाºयांनी बुधवारी एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन केले. नगरपालिका कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास २१ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
सिन्नर व दिंडोरी येथे कर्मचाºयांनी आंदोलन करून आपल्या मागण्याचे निवदेन दिले़ महाराष्टÑ राज्य नगरपालिका, नगरपंचायत मुख्याधिकारी, कर्मचारी व संवर्ग कर्मचारी, कामगार संघटना संघर्ष समितीने प्रलंबित मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांना दिले. सदर निवेदन जिल्हाधिकाºयांकडे पाठविणार असल्याचे मुख्याधिकारी दुर्वास यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी नितीन परदेशी, दीपक भाटजिरे, अनुप गुजराथी, रवींद्र देशमुख, विजय वाजे, सतीश शिंदे, सुनील शिंदे, मणीलाल चौरे, कमलाकर ओतारी, दामू भांगरे, सुरेश गुजराथी, भानुदास घोरपडे, राजेश जाधव, सुकदेव रूपवते, भाऊराव घोडेराव, बाळू भोळे, दीपक पगारे, दीपक वैद्य, यशवंत बेंडकुळे, ताहीर शेख, सोहेफ शेख, संतोष खैरे, पंढरी पवार, जावेद सय्यद, हसन शेख आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Collective leave movement