शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नवीन विभागीय कार्यालयात होणार दहावी बारावीच्या उत्तरपत्रिकांचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 7:36 PM

शिक्षण मंडळाच्या नाशिक विभाग कार्यालयाच्या नूतन इमारत पूर्ण झाली असताना अंतर्गत कामांच्या पूर्ततेअभावी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन व परीक्षा साहित्याचे वितरण द्वारका येथील जुन्याच कार्यालयातून होणार आहे. मात्र परीक्षेनंतर तपासून येणाºया गुणपत्रिकांचे संकलन व परीक्षांचे निकाल नवीन कार्यालयात करण्यात येणार आहे

ठळक मुद्देअंतर्गत कामांच्या पूर्ततेअभावी नूतन कार्यालयाचे हस्तांतरण रखडलेदहावी, बारावी परीक्षेचे कामकाज जून्याच कार्यालयातून

नाशिक: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभाग कार्यालयाच्या नूतन इमारत पूर्ण झाली असताना अंतर्गत कामांच्या पूर्ततेअभावी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन व परीक्षा साहित्याचे वितरण द्वारका येथील जुन्याच कार्यालयातून होणार आहे. मात्र परीक्षेनंतर तपासून येणाºया गुणपत्रिकांचे संकलन व परीक्षांचे निकाल नवीन कार्यालयात करण्यात येईल, असा विश्वास विभागीय मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांनी व्यक्क केला आहे. विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयासाठी आडगाव येथील पाच एकर जागेवर जवळपास २४ कोटी रुपये खर्चून मंडळासाठी तीन मजली प्रशस्त इमारत साकारण्यात आली आहे. या इमारतीचे आॅक्टोबर २०१९ पर्यंत विभागीय शिक्षण मंडळाला हस्तांतरण होणे अपेक्षित होते, परंतु डिसेंबर २०१९ उलटूनही इमारतीचे १०० टक्के काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये होणाºया दहावी व बारावीच्या परीक्षांचे कामकाज द्वारका परिसरातील वाणी हाउस येथील इमारतीतूनच सुरू आहे. त्यानुसार परीक्षेसाठी आवश्यक प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आदी साहित्याचे वितरण जुन्याच्या कार्यालयातून केले जाणार आहे. मात्र परीक्षेनंतर पेपर तपासणी व पडताळणी झाल्यानंतर प्रश्नपत्रिकांचे संकलन व परीक्षांचे निकालपत्रांचे वितरण हे नवीन कार्यालयातून होण्याची शक्यता आहे. नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कार्यालय सध्या वाणी हाउस इमारतीत भाडेतत्त्वावर कार्यरत आहे. त्यासाठी मंडळाला दरमाह ४ लाख ६९ हजार रुपये इतके भाडे मोजावे लागत आहे. दहावी आणि बारावी परीक्षेसाठी जमा होणाºया उत्तरपत्रिका ठेवण्यासाठी गुदामही नाही. यामुळे या उत्तरपत्रिकाही कमी जागेतच साठवून ठेवत त्याची गोपनीयता जपण्याची तारेवरची कसरत मंडळाला करावी लागते. आडगाव येथील पाच एकर जागेत ९२ हजार चौरस फूट बांधकाम असलेली तीन मजली इमारत उभारण्यात आली आहे, परंतु हा प्रकल्प पूर्ण होऊन विभागीय शिक्षण मंडळाला हस्तांतरित झालेला नाही. त्यामुळे नाशिकसह जळगाव, धुळे व नंदुरबार या चारही जिल्ह्यांमध्ये होणाºया दहावी व बारावीच्या परीक्षांची पूर्वतयारी व अन्य कामकाज जुन्याच इमारतीतून करण्याची नामुष्की विभागीय शिक्षण मंडळावर आली आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीSSC Resultदहावीचा निकालexamपरीक्षा