पूर्व विभागात ८,२०७ मूर्तींचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST2021-09-21T04:17:30+5:302021-09-21T04:17:30+5:30
इंदिरानगर : येथील पूर्व विभागाच्या वतीने ८,२०७ श्री मूर्तीचे संकलन व १५ टन निर्माल्य संकलन करण्यात आले. मनपाच्या वतीने ...

पूर्व विभागात ८,२०७ मूर्तींचे संकलन
इंदिरानगर : येथील पूर्व विभागाच्या वतीने ८,२०७ श्री मूर्तीचे संकलन व १५ टन निर्माल्य संकलन करण्यात आले. मनपाच्या वतीने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून आणि जल प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या आवाहनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. नागरिकांनी घरगुती गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन घरीच केले, तसेच कृत्रिम तलावात श्रींचे विसर्जन करून, मूर्ती दान केली. महापालिकेच्या पूर्व विभागाच्या वतीने ८ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली होती. प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने परिसरात निर्माण केलेल्या कृत्रिम तलावात भाविकांनी श्रींची मूर्ती दान केल्याने आणि निर्माल्य संकलन केंद्रात निर्माल्य दिल्याने जलप्रदूषण रोखण्यास मोठा हातभार लागला आहे. साईनाथनगर चौफुली ११२७, राजीवनगर येथील युनिक मैदान १,५७७, कलानगर चौक १,१९१, रामदास स्वामी नगर बस स्टॉपजवळ २५४, डीजीपीनगर क्रमांक एक ३२५, अमरधाम घाट ४९०, लक्ष्मीनारायण घाट १,२४१, संगम घाट १,६६४, टँक ओन व्हील ८८ आदी ठिकाणी कृत्रिम तलावात भाविकांनी मूर्ती विसर्जन करून, ८,२०७ मूर्ती दान केल्या आहेत. पर्यावरणपूरक व जलप्रदूषण रोखण्यास परिसरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.