देवळा येथील महारक्तदान शिबिरात ११६ रक्तपिशव्यांचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 05:38 PM2020-12-24T17:38:01+5:302020-12-24T17:38:28+5:30

देवळा : येथील कर्मवीर रामराव आहेर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, देवळा पंचायत समिती, रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊन, आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महारक्तदान शिबिरात ११६ रक्त पिशव्याचे संकलन झाले.

Collection of 116 blood bags in the blood donation camp at Deola | देवळा येथील महारक्तदान शिबिरात ११६ रक्तपिशव्यांचे संकलन

देवळा येथील महारक्तदान शिबिरात ११६ रक्तपिशव्यांचे संकलन

Next
ठळक मुद्देमहाविद्यालयाच्या प्रांगणात महारक्तदान शिबिर

देवळा : येथील कर्मवीर रामराव आहेर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, देवळा पंचायत समिती, रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊन, आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महारक्तदान शिबिरात ११६ रक्त पिशव्याचे संकलन झाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी मंगळवारी (दि.२२) येथील शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या वतीने महाविद्यालयाच्या प्रांगणात महारक्तदान शिबिर घेण्यात आले. यात जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीला एकूण ११६ रक्त पिशव्यांचे संकलन करून देण्यात आले.

तहसीलदार दत्तात्रय शेजुळ, पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊनचे सेक्रेटरी सुनील देवरे आदींसह आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व सामाजिक-राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
शिबिर यशस्वीतेसाठी प्राचार्य हितेंद्र आहेर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, नासिक जिल्हा रुग्णालयाचे डॉ. लहाटे, रवींद्र शिरसाठ, कार्यक्रम अधिकारी प्रा. राकेश घोडे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.सतीश ठाकरे, वृक्षमित्र सुनील आहेर रासेयोचे स्वयंसेवक अंजली आहेर, कल्याणी आहेर, प्रतिभा देवरे, महेश्वरी गवारे यांनी परीश्रम घेतले.

Web Title: Collection of 116 blood bags in the blood donation camp at Deola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.