मतदार नावे गहाळ प्रकरणी कारवाई थंड बस्त्यात
By Admin | Updated: May 10, 2014 00:23 IST2014-05-09T22:48:12+5:302014-05-10T00:23:45+5:30
निवडणूक शाखेकडे नाही माहिती

मतदार नावे गहाळ प्रकरणी कारवाई थंड बस्त्यात
निवडणूक शाखेकडे नाही माहिती
नाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील तब्बल अडीच लाख मतदारांची नावे गहाळ झाल्या प्रकरणी जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी संबंधित मतदान नांेदणी अधिकार्यांकडून अहवाल मागविला आहे. मात्र दोन आठवडे उलटूनही निवडणूक शाखेकडे यासंदर्भात माहिती व यासंदर्भातील अहवाल प्राप्त नसल्याचे कळते.
२४ एप्रिल रोजीच जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी मतदार यादीतील अडीच लाख नावे वगळल्या प्रकरणी उपजिल्हा निवडणूक अधिकार्यांकडून मतदारांची गहाळ झालेली नावे, ती कशी गहाळ झाली, यासह अन्य बाबींची माहिती शोधून त्यासंदर्भात अहवाल मागविला आहे. मतदान नोंदणी अधिकार्यांना (ई.आर.ओ) यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या असून, त्यासंदर्भात अहवाल मात्र निवडणूक शाखेकडे अद्याप प्राप्त नसल्याचे कळते. जिल्ातील अडीच लाख मतदारांची नावे वगळल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलन करीत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते. त्यासंदर्भात योग्य ती पडताळणी व तपासणी करण्यात येईल,असे आश्वासही जिल्हाधिकार्यांनी दिले आहे. प्रत्यक्षात निवडणूक शाखेकडे दोन आठवडे उलटूनही माहिती आलेली नसल्याचे कळते. तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणुकींमध्येही असा घोळ होऊ नये,यासाठी प्रशासनाने आतापासूनच काळजी घेणे अपेक्षित आहे.(प्रतिनिधी)