देवगांव परिसरात वाढला सर्दी, खोकला आणि तापाचा ज्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:15 IST2021-09-11T04:15:59+5:302021-09-11T04:15:59+5:30

▪️साथीच्या आजारांनी नागरिक हैराण साथीच्या आजारांनी नागरिक हैराण देवगाव : वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे देवगावसह वावीहर्ष, टाकेदेवगाव, श्रीघाट, चंद्राचीमेट, येल्याचीमेट, ...

Cold, cough and fever increased in Devgaon area | देवगांव परिसरात वाढला सर्दी, खोकला आणि तापाचा ज्वर

देवगांव परिसरात वाढला सर्दी, खोकला आणि तापाचा ज्वर

▪️साथीच्या आजारांनी नागरिक हैराण

साथीच्या आजारांनी नागरिक हैराण

देवगाव : वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे देवगावसह वावीहर्ष, टाकेदेवगाव, श्रीघाट, चंद्राचीमेट, येल्याचीमेट, आदी परिसरातील गावांमध्ये सर्दी, खोकला व तापाचा ज्वर वाढला असून, साथीच्या आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळ्यात नागरिकांनी आरोग्याची काळजी घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवावा व उकळून पाणी पिण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

कोरोनाची दुसरी लाट जरी सरत आली असली तरी धोका मात्र अद्याप टळलेला नाही. पावसाळ्यात ओलीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून निरनिराळ्या प्रकारचे आजार पसरले जातात. त्यात कधी कडक ऊन, तर कधी मुसळधार पाऊस यासारख्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अचानक अंगावर काटा येणे, डोके दुखणे, आदी आजारांनी नागरिक ग्रस्त झाले आहेत.

कोरोनाचे संकट कायम असतानाच लहान मुलांसह मोठ्या माणसांमध्येही व्हायरल तापाची साथ वाढली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांमधील ओपीडीदेखील वाढली आहे. त्यामुळे मुलांची योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे. कोरोनाची दुसरी लाट नुकतीच आटोक्यात आली आहे. असे असले तरी कोरोनाचे संकट कायम असून, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच डेंग्यूचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

-------------------

ही घ्यावी काळजी...

सध्या विषाणूजन्य आजाराची साथ आहे. पाच वर्षांवरील मुले बाहेर खेळण्यासाठी एकत्र येतात. अशावेळी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. लहान मुलांना थंड पदार्थ, रस्त्यावरचे अन्न खाण्यापासून रोखावे. सकस आहार खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच पाणी उकळून प्यावे. डासांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच डासांपासून मुलांचे संरक्षण करावे. त्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. मुलांना अंगभर कपडे घालावेत. साथीचे आजार असल्याने घरात एखाद्या मुलाला ताप आला असेल, तर इतर मुलांना त्यापासून दूर ठेवावे. हात स्वच्छ धुवावेत. ही काळजी घेतली, तर कोरोना आणि इतर आजारांपासून मुलांचे संरक्षण होते.

Web Title: Cold, cough and fever increased in Devgaon area