‘त्या’ पित्याकडून सरकारी रुग्णालयाला शवपेटी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:13 IST2020-08-10T21:11:25+5:302020-08-11T01:13:46+5:30
चांदवड/येवला : चांदवड येथे पत्नीचा मृतदेह शवपेटीअभावी मुलीच्या अंत्यदर्शनासाठी ठेवू न शकलेल्या एका पित्याने इतरांची गैरसोय टळावी म्हणू सरकारी रुग्णालयाला वातानुकूलित शवपेटी भेट देत दातृत्वाचे दर्शन घडविले.

‘त्या’ पित्याकडून सरकारी रुग्णालयाला शवपेटी भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड/येवला : चांदवड येथे पत्नीचा मृतदेह शवपेटीअभावी मुलीच्या अंत्यदर्शनासाठी ठेवू न शकलेल्या एका पित्याने इतरांची गैरसोय टळावी म्हणू
सरकारी रुग्णालयाला वातानुकूलित शवपेटी भेट देत दातृत्वाचे दर्शन घडविले.
चांदवड येथील विनायक थोरे यांच्या पत्नी सुमन यांचे २२ मार्च रोजी निधन झाले. मुलगी रत्नागिरी येथे राहत असल्याने तिला यायला उशीर होऊन म्हणून अंत्यसंस्कार लांबणीवर टाकताना मृतदेह ठेवण्यासाठी शवपेटीची आवश्यकता होती. थोरे यांनी शवपेटीचा शोध घेतला, मात्र मिळू शकली नाही. शेवटी लाकडी पेटी बनवून घेऊन त्यात बर्फ टाकून मृतदेह ठेवला.
परंतु, बर्फ वितळू लागल्याने पुन्हा बर्फ मिळणेही अवघड बनल्याने अंत्यविधीचा निर्णय घेतला; परंतु मुलीला अंत्यदर्शन घेता आले
नाही याची रुखरुख लागून राहिली. आपल्या सारखी इतरांची गैरसोय होऊ नये म्हणून थोरे यांनी पत्नीच्या निधनानंतर वातानुकूलित शवपेटी रुग्णालयाला भेट देण्याचा निर्णय घेतला आणि पन्नास हजार रुपये खर्च करून वातानुकूलित शवपेटी रुग्णालयाला भेट दिली. २२ मार्चला माझी पत्नी सुमनचे निधन झाले. माझी मुलगी एक रत्नागिरीला राहत असल्यामुळे ती काही येऊ शकत नव्हती. वातानुकूलित पेटीही उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे अंत्यसंस्कार तातडीने करण्यात आले. इतर नागरिकांची हेळसांड होऊ नये म्हणून चांदवडच्या सरकारी दवाखान्यांमध्ये डॉक्टर आणि नगराध्यक्ष यांच्या साक्षीने वातानुकूलित पेटी भेट दिली.
-विनायक थोरे, मयत सुमन यांचे पती गेल्या अनेक वर्षांपासून चांदवडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये वातानुकूलित शवपेटी मिळावी, अशी मागणी होती. आपल्याकडे बॉडी कॅबिनेट मार्च नेट आरोग्य विभागाकडून मिळाली होती; पण ती अनेक वर्षांपासून नादुरुस्त आह. याबाबत चार वेळा पत्रव्यवहारही झाला. चांदवडचे ज्येष्ठ नागरिक विनायक शिवराम थोरे यांनी रुग्णालयाला शवपेटी भेट देऊन इतरांची गैरसोय टाळली आहे.
- सुशीलकुमार शिंदे, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय, चांदवड