खडक माळेगाव येथे आढळला ‘कोब्रा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 16:34 IST2019-04-28T16:33:25+5:302019-04-28T16:34:29+5:30
वनसगाव : खडक माळेगाव येथील तानाजी मधुकर शिंदे यांच्या घराजवळ कोब्रा जातीचा साप आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शिंदे ...

खडक माळेगाव येथे आढळला ‘कोब्रा’
ठळक मुद्देहा साप सुमारे १५ वर्षाचा आहे. त्याची लांबी४ .५० फूट असून रंग गव्हाळ आहे.
वनसगाव : खडक माळेगाव येथील तानाजी मधुकर शिंदे यांच्या घराजवळ कोब्रा जातीचा साप आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शिंदे हे दुपारी जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले असता तिथे अत्यंत विषारी कोब्रा साप आढळून आला. हा साप सुमारे १५ वर्षाचा आहे. त्याची लांबी४ .५० फूट असून रंग गव्हाळ आहे. शिंदे यांनी त्वरित खाणगाव नजीक येथील सर्पमित्र मंगेश वाकळे यांना बोलावले. वाकळे यांनी सापाला पडकून जंगलात सोडले.
(फोटो २७ वनसगाव १)
फोटो-
कोब्रा जातीचा साप पकडताना सर्पमित्र मंगेश वाकळे.ं