सहकार तज्ञ भास्करराव कोठावदे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2022 19:52 IST2022-05-24T19:20:07+5:302022-05-24T19:52:02+5:30
सहकार क्षेत्रातील तज्ञ आणि नाशिक मर्चंट बँकेचे भास्करराव कोठावदे यांचे आज अल्पशा आजराने निधन झाले.

सहकार तज्ञ भास्करराव कोठावदे यांचे निधन
सहकार क्षेत्रातील तज्ञ आणि नाशिक मर्चंट बँकेचे भास्करराव कोठावदे यांचे आज अल्पशा आजराने निधन झाले. मृत्यू समयी ते 73 वर्षांचे होते. गेल्या चाळीस वर्षापासुन सहकार क्षेत्राशी सबंधीत असलेल्या कोठावदे यांनी अनेक संस्थांवर काम केले होते.
कोठावदे कोठवदे हे नामकेा बँकेचे सुमारे 25 वर्षे संचालक होते तसेच माजी अध्यक्ष होते. सुवर्णा नागरी सहकारी पतंसस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष व नासिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे राज्य पातळीवरील पदाधिकारी होते. सहकार क्षेत्रात त्यांनी निस्पृहपणे काम केले होते. लाड शाखीय वाणी समाजाच्या प्रत्येक कार्यात ते हिरीरीन सहभागी होत असत.