देवळा बाजारात वाटाण्यास रंग लावून ग्राहकांची फसवणूक
By Admin | Updated: July 6, 2016 00:45 IST2016-07-06T00:02:11+5:302016-07-06T00:45:57+5:30
देवळा बाजारात वाटाण्यास रंग लावून ग्राहकांची फसवणूक

देवळा बाजारात वाटाण्यास रंग लावून ग्राहकांची फसवणूक
तळेगाव रोही : वाटाण्यास आकर्षक रंग लावून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार देवळा तालुक्यात उघड झाला आहे. चांदवड तालुक्यातील काळखोडे येथील दत्तू मोठाभाऊ शेळके यांनी भाजीसाठी देवळ्याच्या रविवारच्या बाजारातून वाटाणा आणला. तो धुतला असता हिरव्या रंगाचे पाणी तयार झाले. तसेच गरम पाण्यात शिजवण्यासाठी टाकला असता पूर्ण वाटाणा रंगहीन झाला. त्यामुळे वाटाण्यास लावलेले रासायनिक द्रव्य आहे की रंग असा प्रश्न ग्राहकास पडला आहे. रासायनिक द्रव्य टाकून हिरवा बनवलेला वाटाणा आरोग्यास अपायकारक होऊ शकत असल्याने याबाबत सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण होत आहे. कृत्रिम रंग वापरून हिरवागार दिसणारा वाटाणा बाजारात विक्र ीचे प्रमाण वाढले असल्याने अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा पोलीसपाटील हर्षाली शेळके यांनी दिला आहे. अशा फसव्या संशयितावर प्रशासनाने कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)