क्लबहाउस, बगीच्यातही एकत्र येऊ नका; संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 19:01 IST2020-03-27T18:54:56+5:302020-03-27T19:01:09+5:30
शहरातील सहकारी संस्थांनी गृहनिर्माण संस्थेच्या गेटजवळ सॅनिटायझर ठेवून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात स्वच्छ करण्याच्या सूचना करण्यासोबतच सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे आवाहन करतानाच सोसायटीच्या आवारात क्लबहाउस आणि बगीचा अशा ठिकाणीही मुलांनी व सदस्यांनी एकत्रित येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.

क्लबहाउस, बगीच्यातही एकत्र येऊ नका; संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
नाशिक : जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे आवाहन करतानाच सोसायटीच्या आवारात क्लबहाउस आणि बगीचा अशा ठिकाणीही मुलांनी व सदस्यांनी एकत्रित येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.
शहरातील सहकारी संस्थांनी गृहनिर्माण संस्थेच्या गेटजवळ सॅनिटायझर ठेवून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात स्वच्छ करण्याच्या सूचना करण्यासोबतच इंटरकॉमद्वारे प्रत्येक सदस्याने आवश्यक असणाऱ्या किराणा, भाजीपाला इत्यादी गोष्टींची मागणी एकत्रित करावी व त्यानुसार जवळच्या ठिकाणाहून किराणा व भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू मागवून घेणे. त्यानंतर या वस्तू योग्य ती खबरदारी घेऊन प्रत्येक सदस्याच्या घरी सुरक्षारक्षकांमार्फ त पोहोच कराव्यात किंवा प्रत्येक घरातील एक सदस्यास बोलावून गेटवरच त्याचे वाटप करावे, मात्र हे करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. कामाशिवाय बाहेर जाणार नाहीत याची दक्षता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच सोसायटीचे क्लबहाउस, बगीचा येथे सदस्य किंवा लहान मुले एकत्र येणार नाहीत, याबाबत योग्य ती दक्षता घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यांनी दिल्या आहेत.