गोदाकाठी ढगाळ वातावरण , द्राक्ष उत्पादकांना धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 16:19 IST2020-12-12T16:19:10+5:302020-12-12T16:19:39+5:30
चांदोरी : दोन दिवसापासून द्राक्षाच्या पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदाकाठी सुद्धा ढगाळ वातावरण असून पिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.

गोदाकाठी ढगाळ वातावरण , द्राक्ष उत्पादकांना धास्ती
चांदोरी : दोन दिवसापासून द्राक्षाच्या पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदाकाठी सुद्धा ढगाळ वातावरण असून पिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.
गहू ,हरभरा तसेच द्राक्ष ,कांदा या पिकांवर रोगराई वाढण्यास सुरुवात झाली आहे. याचा विपरीत परिणाम द्राक्ष बागांवर होत आहे. द्राक्ष उत्पादकांनी या वातावरणामुळे चांगलीच धास्ती घेतली आहे. तसेच रात्री व शनिवारी दुपारी पावसाने हलकी हजेरी लावल्याने रोगांपासून द्राक्ष बाग वाचविण्यासाठी औषध फवारणी करावी लागत आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. तसेच कांदा पिकांवर करपा रोग पडण्याची शक्यता असल्याचे जाणकार शेतकरी सांगत आहेत.