मेशीसह परिसरात ढगाळ वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:06 IST2021-01-04T20:31:12+5:302021-01-05T00:06:20+5:30
मेशी : परिसरात ढगाळ वातावरणाने डोके वर काढल्याने कांदा पिकासह गहू, हरभरा आदी पिकांवर विविध रोगांचे आगमन झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

मेशीसह परिसरात ढगाळ वातावरण
या हंगामात दोन-तीन दिवस चांगले वातावरण तर अचानक बदल होत असलेल्या हवामानाचा प्रतिकूल परिणाम सर्वच पिकांवर होत आहे. या भागाचे तिन्ही हंगामातील प्रमुख पिक कांदा आहे, परंतु या पिकाला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी फटका बसतो आणि ती बळीराजाची डोकेदुखी ठरते. कांदा पिकांसह उन्हाळी कांद्याचे रोपांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महागडी बियाणांची खरेदी करून पेरणी केली, परंतु सततच्या बदलत असलेल्या वातावरणाचा त्यावर विपरीत परिणाम होत आहे. कांदा पीक आणि रोप यांच्यावर महागडी औषध फवारणी करूनही फायदा होत नाही. सध्या रोगट हवामानाचा आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचे आगमन झाले आहे.