शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानामुळे द्राक्षपंढरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 21:15 IST

पिंपळगाव बसवंत : परतीच्या पावसामुळे यंदाचे हंगामच हातातून गेल्यामुळे पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याने संपूर्ण बागेवर कुर्हाड चालविली आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : घड जिरल्याने द्राक्षबागा जमीनदोस्त

पिंपळगाव बसवंत : परतीच्या पावसामुळे यंदाचे हंगामच हातातून गेल्यामुळे पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याने संपूर्ण बागेवर कुर्हाड चालविली आहे.गेल्या चार पाच दिवसापासून कधी थंडी कधी ऊन तर कधी ढगाळ रोगट हवामान असल्याने निफाड तालुक्यातील द्राक्षबागांवर डावण्या सारख्या रोगाचा प्रार्दुभाव दिसू लागला असून घड जिरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी द्राक्षबागांवर कुºहाड मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पिंपळगाव बसवंत परिसरातील शेतकरी सागर शिंदे यांनी एक एकर द्राक्ष बागेवर कुºहाड मारत द्राक्ष बाग जमीनदोस्त केली आहे.दुसºया टप्यातील छाटणीच्या द्राक्षबागा तयार झाल्या आहेत. त्यामुळे अश्या वातावरणात किंचितही बेमोसमी पाऊस झाला तर डावण्या, भुरी व पोग्यात असलेले घड जिरण्याची चिंता निर्माण झाली आहे दुपारी आर्द्रता व सकाळी धुके तर पावसाची रिप रिप अशा स्थितीमध्ये डावणी रोगाने धुमाकुळ घालायला सुरवात केली आहे.निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, आहेरगाव, मुखेड, बेहड, कारसूळ, लोनवाडी, दावचवाडी, अंतरवेली, पाचोरे, शिरवाडे वणी, उंबरखेड, नारायण टेंभी, पालखेड, रानवड, कसबे सुकेना, साकोरे, कोकणगाव या गावामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांची लागवड झालेली आहे. सध्याच्या स्थितीत पोग्यात असलेल्या बागामध्ये मोठ्या प्रमाणात घड जिरण्याचे प्रमाण व डावणीच्या रोगाचा देखील प्रादुर्भाव दिसू लागला आहे. दररोजचे ढगाळ वातावरण व त्यात बेमोसमी पडणारा पाऊस त्यात सकाळी पडणारे दव यामुळे फवारणी करूनही दुसºया दिवशी रोग तसाच दिसतो.आमच्या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेचे नुकसान झाले. हे नुकसान कधीही न भरून येणारे आहे. झालेल्या नुकसानाला कंटाळून द्राक्ष बागेवर कुºहाड चालवावी लागली. परिणामी आतापर्यंत बागेवर केलेला लाखो रु पयांचा खर्च पाण्यात गेला आहे.- सागर शिंदे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पिंपळगाव बसवंत.बेमोसमी पावसामुळे द्राक्ष घड जिरण्याचे प्रमाण वाढले असल्याने द्राक्ष बागावर खर्च केलेले लाखो रु पये पाण्यात गेले आहे. प्रचंड नुकसान होऊन तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला असल्याने प्रशासनाने पंचनामे करून शेतकºयांना दिलासा देणे गरजेचे आह.े- उद्धराजे शिंदे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पिंपळगाव बसवंत. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी