‘त्या’ बॅगेत सापडले कपडे अन् मतदार याद्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:03 AM2019-10-21T00:03:06+5:302019-10-21T00:34:55+5:30

डोंगर पोखरून निघाला उंदीर या म्हणीचा प्रत्यय रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास निवडणूक विभागाच्या भरारी पथकाला आला. पूर्ण भरलेल्या एका बॅगची अधिकऱ्यांच्या उपस्थितीत सूक्ष्म तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गच्च भरलेले कपडे आणि काही मतदार याद्या सापडल्या.

Clothing and voter lists were found in 'that' bag | ‘त्या’ बॅगेत सापडले कपडे अन् मतदार याद्या

‘त्या’ बॅगेत सापडले कपडे अन् मतदार याद्या

Next

घोटी : डोंगर पोखरून निघाला उंदीर या म्हणीचा प्रत्यय रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास निवडणूक विभागाच्या भरारी पथकाला आला. पूर्ण भरलेल्या एका बॅगची अधिकऱ्यांच्या उपस्थितीत सूक्ष्म तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गच्च भरलेले कपडे आणि काही मतदार याद्या सापडल्या; मात्र या घटनेत लाखोंची रोकड सापडल्याची अफवा सोशल मीडियावर चांगलीच पसरली.
टाके घोटी येथील टोलनाक्याजवळ एका हॉटेलमध्ये मतदारांना वाटण्यासाठी लाखोंची रक्कम आली आहे. पदाधिकाऱ्यांकडे या रकमेचे वाटप होत आहे अशा आशयाची तक्र ार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अर्चना भाकड यांच्याकडे एका तक्रारदाराने केली. तातडीने त्यांनी भरारी पथकाचे प्रमुख एन. टी. शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक ए. एम. माळी यांना कारवाई करण्याबाबत कळविले. भरारी पथकाने सदर हॉटेलास पथकासह भेट दिली. संशयास्पद व्यक्तींवर लक्ष केंद्रित करून संपूर्ण हॉटेलची तपासणी केली, यामध्ये एक बॅग संशयास्पद स्थितीत आढळून आली. पंचनामा करून कारवाई करण्यासाठी बॅग उघडली असता त्यामध्ये गच्च भरलेले कपडे आणि काही मतदार याद्या आढळून आल्या. यामुळे भरारी पथकाला हात हलवत माघारी फिरावे लागले; मात्र इगतपुरी तालुक्यातील गावागावांत या प्रकरणाची विशेष चर्चा रंगली.

Web Title: Clothing and voter lists were found in 'that' bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.