मराठा क्रांती मोर्चामुळे २४ रोजी बाजार समिती बंद
By Admin | Updated: September 13, 2016 01:34 IST2016-09-13T01:33:30+5:302016-09-13T01:34:53+5:30
मराठा क्रांती मोर्चामुळे २४ रोजी बाजार समिती बंद

मराठा क्रांती मोर्चामुळे २४ रोजी बाजार समिती बंद
नाशिक : येत्या २४ सप्टेंबरला नाशिक जिल्ह्यातून मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चामध्ये ग्रामीण भागातून लाखो नागरिक सहभागी होणार आहेत. त्यामुळे २४ सप्टेंबरला शहरात येणारे रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा येण्याची शक्यता असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिंडोरी रोडवरील व पेठरोडवरील कामकाज बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी दिली.
ग्रामीण भागातून लाखो शेतकरी या मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणार असल्याने या शेतकऱ्यांची चारचाकी वाहने लावण्यासाठी दिंडोरीरोडवरील बाजार समितीच्या आवारात तसेच शरदश्चंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवारात वाहनतळाची सोय करण्यात येणार असल्याचेही देवीदास पिंगळे यांनी सांगितले. २४ सप्टेंबरचा मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार असल्याने या दिवशी शहरातील बहुतांश व्यवहार व कामकाज बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी त्यांचा भाजीपाला विक्रीसाठी नाशिक बाजार समितीत आणू नये, नाही तर मालाचे विक्रीअभावी नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल व भाजीपाला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन पिंगळे यांनी केले आहे.