वसतिगृह बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:13 IST2021-09-25T04:13:24+5:302021-09-25T04:13:24+5:30

वसतिगृह जिल्हा, तालुका वसतीगृह, विभागीय वसतिगृह व शहरी अशी वसतिगृहांची विभागणी केली जाते. शहरात ...

The closure of the hostel affects the admission process of students | वसतिगृह बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम

वसतिगृह बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम

वसतिगृह जिल्हा, तालुका वसतीगृह, विभागीय वसतिगृह व शहरी अशी वसतिगृहांची विभागणी केली जाते. शहरात शिक्षणाची व्यवस्था असल्याने प्रवेश घेऊ शकतात पण राहण्याची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांचे सर्वत्र हाल होत आहेत. वसतिगृहांमध्ये मोफत निवासी भोजनाची व्यवस्था समाजकल्याण विभागांतर्गत त्याचप्रमाणे गुणवत्तेवर त्यांना राहण्याची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे आरक्षणानुसार सर्व जातीधर्मांना न्याय देऊन त्याठिकाणी प्रवेश दिला जातो. एका विद्यार्थ्यांमागे चार हजार रुपयांचा खर्च महिन्याला केला जातो. त्याचप्रमाणे आठशे रुपये स्टायपेंड दिली जाते. दोन हजार रुपये गणवेशासाठी दिली जातात. शासनाचे यामुळे करोडो रुपये वाचलेले आहेत, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे मात्र दुर्लक्ष होत असून शहरांमध्ये राहण्याची व्यवस्था नसल्याने सर्वच प्रक्रियेत निर्बंध आलेले आहेत.

जरी ऑनलाईन शिक्षण चालू झाले तरी प्रवेश प्रक्रिया पावती कागदपत्रांसाठी स्वतः हजर रहावे लागते. काही गावामधून बस अजूनही बंद आहेत. शहरात राहायचे कुठे असा प्रश्न पडला आहे. शहरातील प्रवेशासाठी वसतिगृहात विद्यार्थी येत असल्यामुळे विद्यार्थी येत असतात. परंतु कोरोनाच्या काळात वसतिगृह बंद असल्याने प्रवेशावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या घटली असून शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

शासनाने लवकर वसतिगृह सुरू करुन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी एकलव्य संघटनेचे सटाणा तालुका कार्य अध्यक्ष शांताराम गायकवाड, सुनील बागुल, राजेंद्र बागुल, शांताराम पानपाटील, शिवाजी पानपाटील यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

कोट...

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने जरूर विचार करावा. याचा परिणाम शाळा व महाविद्यालयीन प्रवेशावर निश्चित झाला आहे.

- प्रा. रवींद्र मोरे, पर्यवेक्षक, म.स.गा कनिष्ठ महाविद्यालय. मालेगाव

Web Title: The closure of the hostel affects the admission process of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.