दानपेटी फोडणाऱ्या पुजाऱ्याला कोठडी

By Admin | Updated: September 9, 2016 00:24 IST2016-09-09T00:24:27+5:302016-09-09T00:24:39+5:30

दानपेटी फोडणाऱ्या पुजाऱ्याला कोठडी

The closet to the priest who broke the basket | दानपेटी फोडणाऱ्या पुजाऱ्याला कोठडी

दानपेटी फोडणाऱ्या पुजाऱ्याला कोठडी

देवळाली कॅम्प : आग्यारीमधील दानपेट्या फोडून पावणेदोन लाखाची रोकड लंपास करणाऱ्या पुजाऱ्याला नाशिकरोड न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
२० दिवसांपूर्वी चार दानपेट्यांपैकी दोन दानपेट्या फोडून एक लाख ८२ हजारांची रोकड चोरून नेल्यात आली होती. आग्यारीचे पुजारी होमियार सिंधवा यांनी याबाबत फिर्याद दिली होती.
चोरीच्या प्रकरणात पुजारी होमियार सिंधवा याच्यावरच संशय बळावल्याने त्याच्यावर गुप्तरित्या नजर ठेवली होती. सिंधवा मंगळवारी सकाळी घरून बॅग घेऊन रिक्षातून जात असताना पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये एक लाख ८२ हजारांची रोकड मिळून आली होती. (वार्ताहर)

Web Title: The closet to the priest who broke the basket