साखर कारखान्यांची बंद धुराडी, ऊस लागवडीत निफाडची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:21 IST2020-07-13T22:05:50+5:302020-07-14T02:21:40+5:30
सायखेडा : नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ऊस लागवड निफाड तालुक्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे, तर जिल्ह्यात ७४१२ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

साखर कारखान्यांची बंद धुराडी, ऊस लागवडीत निफाडची आघाडी
सायखेडा : नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ऊस लागवड निफाड तालुक्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे, तर जिल्ह्यात ७४१२ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
एकेकाळी देशपातळीवर सुवर्णपदक पटकावलेल्या निसाका, रासाका आणि कादवा गोदा कारखाने निफाड तालुक्याचे गतवैभव असले तरी आज या तिन्ही कारखान्यांची धुराडी बंद अवस्थेत आहेत. तरीही निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीत आघाडी घेतल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे. दरम्यान, तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन बंद असलेले साखर कारखाने सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची भावना ऊस उत्पादकांनी व्यक्त केली आहे.
--------------------
कोरोनामुळे रसवंती, चाºयावरही परिणाम
निफाड येथील कारखाने बंद असले तरी तालुक्याच्या उसाला असलेली गोडी देशभरात प्रसिद्ध असल्याने हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्रासह अन्य राज्यांतून मोठ्या प्रमाणात रसवंतीसाठी उसाला मागणी असते. याशिवाय जनावरांच्या चाºयासाठी स्थानिकसह खान्देश मराठवाड्यातून मागणी असते. मात्र यंदा कोरोनाच्या उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये रसवंती बंद आहेत. चांगल्या पावसामुळे चाºयाची उपलब्धता नसल्यामुळे उसाची मागणी मोठ्या प्रमाणावर घटणार असल्याचे दिसून येत आहे.
--------
गत काही वर्षांपासून उत्पादकांना कारखाने बंद असल्याने बाहेरच्या कारखान्यांना ऊस द्यावा लागतो. त्यामुळे स्थानिक कारखाने सुरू झाल्यास तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा श्रम, पैसा आणि वेळेची बचत होणार आहे.
- भाऊसाहेब कमानकर,
ऊस उत्पादक
--------------------
निसाका, रासाका सुरू व्हायलाच हवे. ऊस उत्पादक शेतकºयांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. आम्ही अनेकदा याविषयी आंदोलने केली आहेत, तरी कारखाने सुरू होत नाहीत. राजकीय लोकांनी कारखाना खेळण्याचे बाहुले बनवले आहे. इच्छाशक्ती असेल तर अशक्य काहीच नाही. ऊस उत्पादक शेतकºयांच्या भावनांशी खेळणे बंद करावे.
- धोंडीराम रायते, अध्यक्ष, निसाका बचाव समिती