देवगाव : गेल्या महिन्यात मुसळधार बरसलेला पाऊस सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभीच गायब होऊन वातावरणात एकदम उष्मा निर्माण झाला आहे. गेल्या चार पाच दिवसांत देवगाव परिसरात किमान तापमानात पाच ते सहा सेल्सिअसने वाढ झाली असून सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर हिट सारखे गरम होऊन चटके बसत आहेत.गेल्या महिन्यात पावसाची संततधार कायम होती, त्यामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला होता. परिणामी कमाल आणि किमान तापमान कमी झाले होते. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून पाऊस गायब झाल्याने देवगाव परिसरात प्रचंड उष्मा वाढून उन्हाचा जोरदार तडाखा बसत आहे.आठ दिवसांपूर्वी कमाल तापमान जवळपास २९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतके होते. मात्र, आठ दिवसांत कमाल आणि किमान तापमान ३२ अंश सेल्सिअस इतके झाले. या दोन्ही तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे वातावरण अधिक उष्ण झाले आहे. मुळात हवेतील आद्रता, हवेतील ओलावा कमी आला आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा अधिक बसत आहे.सध्याच्या वातावरणामुळे नागरिक घामाघूम होत आहेत. मुळात सप्टेंबरच्या सुरु वातीलाच जाणवणारा हा उष्मा आॅक्टोबर हिटची चाहूल वाटत आहे. परंतु, हिट जरी वाढली असली तरी कोरोनाच्या धास्तीमुळे क्लोड्रिंक्स पिण्यास फारसे कुणी धजावताना दिसत नाही. दरम्यान,वाढत्या उष्णतेमुळे अन्य साथीचे रोग पसरण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
सप्टेंबर महिन्यात आॅक्टोबर हिटचे चटके...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 16:17 IST
देवगाव : गेल्या महिन्यात मुसळधार बरसलेला पाऊस सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभीच गायब होऊन वातावरणात एकदम उष्मा निर्माण झाला आहे. गेल्या चार पाच दिवसांत देवगाव परिसरात किमान तापमानात पाच ते सहा सेल्सिअसने वाढ झाली असून सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर हिट सारखे गरम होऊन चटके बसत आहेत.
सप्टेंबर महिन्यात आॅक्टोबर हिटचे चटके...
ठळक मुद्देनागरिक घामाघूम : पावसाची पाठ फिरताच उन्हाचा तडाखा