महात्मा गांधी जयंती निमित्त सुरगाणा येथे स्वच्छता मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 16:54 IST2018-10-02T16:53:19+5:302018-10-02T16:54:00+5:30

सुरगाणा : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सुरगाणा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नागरिक, महिला, विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच भाजप, युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला.

Cleanliness campaign at Surgana on the occasion of Mahatma Gandhi Jayanti | महात्मा गांधी जयंती निमित्त सुरगाणा येथे स्वच्छता मोहिम

महात्मा गांधी जयंती निमित्त सुरगाणा येथे स्वच्छता मोहिम

ठळक मुद्देदुर्गादेवी मंदिर व स्वामी समर्थ केंद्रातून स्वच्छता मोहिमेला सुरु वात

सुरगाणा : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सुरगाणा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नागरिक, महिला, विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच भाजप, युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला.
भाजपच्या वतीने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा पदाधिकारी विजय पुराणिक, जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, सुनिल केदारे, बापूसाहेब आदींसह कलावती चव्हाण, नगरसेवक रंजना लहरे, तालुकाध्यक्ष रमेश थोरात, युवा तालुकाध्यक्ष विजय कानडे, सचिन महाले, नारायण देशमुख, भावडू चौधरी, एन. डी. गावित तसेच शिवसेनेच्या उपनगराध्यक्ष दीप्ती चव्हाण, नगरसेवक भारत वाघमारे, श्रीमती वळवी आदींसह शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.
येथील दुर्गादेवी मंदिर व स्वामी समर्थ केंद्रातून स्वच्छता मोहिमेला सुरु वात करण्यात आली. तत्पुर्वी भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी प्रतिमा पुजन करु न महात्मा गांधींच्या कार्याबाबत मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मंदीर आवारात स्वच्छता करण्यात आली. महात्मा गांधी यांचा फोटो व स्वच्छता फलक लावलेले वाहन, भक्ती गीते व टाळ मृदुंगाच्या गजरात रॅली काढण्यात येऊन गावात विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
 
Web Title: Cleanliness campaign at Surgana on the occasion of Mahatma Gandhi Jayanti