शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

लासलगावी कीर्तन सोहळ्यासह धार्मिक स्थळांची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 00:52 IST

लासलगाव : लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या २५व्या स्मृती सोहळ्या अंतर्गत कीर्तन सोहळ्यासह लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचलित सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक यांच्या सहभागाने शहरातील विविध धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्यात आली.

ठळक मुद्देप्रभाकर काकडे यांच्या हस्ते संत पूजन

लासलगाव : लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या २५व्या स्मृती सोहळ्या अंतर्गत कीर्तन सोहळ्यासह लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचलित सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक यांच्या सहभागाने शहरातील विविध धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्यात आली.                 कै. लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या पुतळ्यास सीताराम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यालयात वारकरी महामंडळ समिती प्रमुख कीर्तनकार हभप श्रावण महाराज अहिरे (कुकाणे) मालेगाव यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हभप प्रभाकर काकडे यांच्या हस्ते संत पूजन करण्यात आले.                                    अध्यक्षस्थानी जनार्दन जगताप तर प्रमुख अतिथी म्हणून केदू जगताप, अरविंद देसाई, निवृत्ती सावकार, भागवतराव होळकर, रंगनाथ कोपुलकर, मोतीराम डोंगरे, उत्तम जाधव, दिलीपराव पानगव्हाणे, अर्जुन माळी, विठ्ठलराव नागरे, भास्कर पवार, दीपक शिरापुरे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, पं.स. सदस्य रंजना पाटील, संचालक नीताताई पाटील, पुष्पाताई दरेकर, शंतनू पाटील, लक्ष्मण मापारी, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, प्राचार्य विश्वासराव पाटील, मुख्याध्यापक संजीवनी पाटील, अनिस काझी, पर्यवेक्षक दत्तू गांगुर्डे, सुधाकर सोनवणे आदी उपस्थित होते.                                        सूत्रसंचालन श्रीहरी शिंदे तर दत्ता महाराज मरकड यांनी स्वामी महाराजांचा परिचय करून दिला. यावेळी परिसरातील नागरिक कीर्तन सोहळ्यासाठी उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSocialसामाजिक