Cleaning campaign at Khed | खेड येथे स्वच्छता अभियान

खेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याप्रसंगी भावराव धादवड, डॉ. संजय पवार, पांडुरंग बोराडे, राजेंद्र गायकवाड, संजय धादवड आदींसह निरंकारी मंडळातील सदस्य.

घोटी : सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचा जन्मदिवसानिमित्त इगतपुरी तालुक्यातील खेड येथे संत निरंकारी मंडळाकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
संत निरंकारी मंडळ शाखा शिरेवाडीचे प्रमुख भाऊराव धादवड, पांडुरंग बोराडे, सुनंदा घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र खेड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी डॉ. पंकज गुप्ता, डॉ संजय पवार, त्र्यंबक वाजे, किसन उंबरे, माधव भगत, प्रभाकर वाजे, लीलाबाई जाधव, किसन कोरडे, भरत मराडे, हिरा धादवड, अर्चना खादे, गणेश धादवड, रामदास घाणे, आबाजी लोहकरे, दौलत कोरडे, सुदाम कातोरे, गणेश कातोरे आदींसह सेवा दल व भक्तांनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली व एकतेचा संदेश दिला.
यावेळी परिसरातील खडकेद, वासाळी, बांबळेवाडी, टाकेद, बोरीची वाडी, फळविहीरवाडी येथील शेकडो भाविक उपस्थित होते.
तेजपाल तोकडे, राहुल उबाळे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव सदो येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व घोटी शाखेचे प्रमुख सुधाकर दुर्गुडे, पंडित डहाळे, राम भटाटे व शिवाजी बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय घोटी, प्राथमिक आरोग्य केंद्र काळुस्ते व वैतरणा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

Web Title: Cleaning campaign at Khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.