घोटी शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 21:16 IST2019-09-01T21:16:37+5:302019-09-01T21:16:54+5:30
घोटी : ग्रामपालिकेच्या माध्यमातून रविवारी (दि.१) स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरु करण्यात आले. सरपंच मनोहर घोडे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्गाने घोटी शहरात स्वच्छता प्रचार मोहीम राबविली.

घोटी शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान
घोटी : ग्रामपालिकेच्या माध्यमातून रविवारी (दि.१) स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरु करण्यात आले. सरपंच मनोहर घोडे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्गाने घोटी शहरात स्वच्छता प्रचार मोहीम राबविली.
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत ही मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेला सरपंच प्रा. मनोहर घोडे, उपसरपंच संजय आरोटे यांच्या उपस्थितीत सुरु वात करण्यात आली. सदस्यांनी गटनिहाय मोहीम राबविली. ग्रामस्थानी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, रस्त्यावर टाकू नये, प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन करण्यात आले.
आगामी चार पाच दिवसात याबाबत प्रबोधन व प्रचार करण्यात येणार असून ग्रामस्थानी देखील या मोहिमेत सहभागी होऊन आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.
या मोहिमेत पं. स. सदस्य अण्णा पवार, ग्रामपालिका सदस्य रामदास भोर, संजय जाधव, श्रीकांत काळे, सचिन गोणके यांच्यासह सदस्य, कर्मचारी तसेच पोलीस उपनिरीक्षक विलास घिसाडी, माळी आदि सहभागी झाले होते.
(फोटो ०१ घोटी)