सटाणा नाक्यावर दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:23 IST2019-03-02T23:20:47+5:302019-03-02T23:23:09+5:30

मालेगाव : शहरातील सटाणा नाका भागात दोन गटात लोखंडी रॉड, लाकडी दांडुका व लाथाबुक्क्यांनी मारहाणीचा प्रकार घडला.

Clash of two groups on Satana nose | सटाणा नाक्यावर दोन गटात हाणामारी

सटाणा नाक्यावर दोन गटात हाणामारी

ठळक मुद्दे मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण

मालेगाव : शहरातील सटाणा नाका भागात दोन गटात लोखंडी रॉड, लाकडी दांडुका व लाथाबुक्क्यांनी मारहाणीचा प्रकार घडला.
या प्रकरणी दोघा गटांविरुद्ध कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिलिंद मुकेश खैरनार, रा. ओमकार कॉलनी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सटाणा नाका भागात जात असताना नितीन शरद खेडकर व त्याच्या दोघा मित्रांनी भांडणात का पडला, अशी कुरापत काढून मारहाण केल्याचे म्हटले आहे.
तर अनिरुद्ध खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मिलिंद खैरनार व त्याच्या सोबतचे तिघांनी मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण केले आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार डिंगर व पोलीस नाईक पवार हे करीत आहेत.

Web Title: Clash of two groups on Satana nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.