वणी : येथील विद्युत वितरण उपकेंद्रामागील असलेल्या संस्कृतीनगरातील रहिवाशांना तीव्रपाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, रहिवाशांनी पाणीपुरवठा व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपालिकेकडे साकडे घातले आहे. कृष्णगाव रस्त्यावर उपकेंद्राच्या मागील बाजूस असलेल्या संस्कृतीनगरात बंगलो, रो-हाऊसेस, अपार्टमेंट यामध्ये सुमारे तीनशे कुटुंबीय वास्तव्य करत आहे, तसेच १०० प्लॉटधारक आहेत. या भागात ग्रामपालिकेची पाणीपुरवठा व्यवस्था कार्यान्वित नसल्याने खासगी बोअरवेल व टँकरच्या सहाय्याने पाण्याची गरज भागविण्यात येते. प्रत्येकाने स्वतंत्र्य बोअरवेल केल्याने भूजल पातळीत कमालीची घट झाली असून, बहुतांशी बोअरवेलला पाणी नाही. फेब्रुवारी महिन्यापासूनच पाण्याची कमतरता भासू लागली होती. तद्नंतर पाण्याची तीव्रता कमालीची जाणवू लागली आहे. तहान भागविण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. उपकेंद्रामागील वस्तीत पाणीपुरवठा व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी सुमारे ४५ लाख रु पयांचा अंदाजे खर्च अपेक्षित आहे. सुमारे आठ किलोमीटर अंतरात अंतर्गत भाग प्रमुख वितरण केंद्र व रहिवाशी ठिकाणे याचा समावेश भविष्यकालीन योजना लक्षात घेत असल्याची माहिती देण्यात आली. यासाठी सात हजार रुपये अनामत देण्याची प्रत्येक कुटुंबाची तयारी असल्याची माहिती या भागातील रहिवाशी व्यंकटेश मालाणे यांनी दिली. या भागातील निवासस्थानाची मोजणी करून ती यादी ग्रामपालिकेकडे जमा केल्यानंतर खर्चाचा आवाका व प्रत्यक्ष काम याचा समन्वय साधत या समस्येचे निराकारण करण्यासाठी नियोजित बैठकीत सकारात्मक मार्ग निघाला असला तरी अत्यावश्यक पाणी वितरणव्यवस्था कार्यान्वित होणेकामी अग्रक्रम देण्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिक त्रस्त : जलकुंभाला पाण्याची प्रतीक्षा संस्कृतीनगरमध्ये तीव्र पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 23:59 IST
वणी : येथील विद्युत वितरण उपकेंद्रामागील असलेल्या संस्कृतीनगरातील रहिवाशांना तीव्रपाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे,
नागरिक त्रस्त : जलकुंभाला पाण्याची प्रतीक्षा संस्कृतीनगरमध्ये तीव्र पाणीटंचाई
ठळक मुद्देभूजल पातळीत कमालीची घट झाली बहुतांशी बोअरवेलला पाणी नाही