शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

तिरंगी लढतीकडे शहराचे लक्ष

By admin | Updated: November 17, 2016 23:21 IST

येवला : राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा बंडखोर झुंजणार

येवला : सलग दोन पंचवार्षिक राष्ट्रवादीने उमेदवारीचे गाजर दाखवले, पक्ष बदलला, भाजपाने थेट उमेदवारीचे आश्वासन दिले. पुन्हा डावलले गेले. नाराजी झाली. पुन्हा बंडाचा पवित्र घेऊन भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रीतिबाला पटेल यांनी अपक्ष उमेदवारी केली. निवडणूक म्हटली तर कोणीतरी एकच उमेदवार विजयी होणार असला तरी या प्रभागात तिरंगी लढतीत मात्र रंगत आली आहे.येवला पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ अ मधून चंदा सोहन दुगड (राष्ट्रवादी), छाया शैलेश देसाई (शिवसेना), कृष्णा संतोष परदेशी (कॉँग्रेस) व प्रीतिबाला राजीव पटेल (भाजपा बंडखोर- अपक्ष) हे चार उमेदवार रिंगणात असले तरी लढत मात्र राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा बंडखोर-अपक्ष उमेदवार यांच्यात आहे.येवला पालिकेच्या प्रभाग क्र मांक ७ अ मधून राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्ष उमेदवार यांच्यात होणाऱ्या तिरंगी लढतीत भाजपाने प्रीतिबाला पटेल यांना उमेदवारीची संधी देण्याचा निश्चय केला होता; परंतु या संपूर्ण प्रभागात भाजपा-सेनेला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. (वार्ताहर)४शिवसेनेने या प्रभागात दोन्ही जागांवर हक्क सांगितला. आणि भाजपा महिला आघाडीच्या प्रीतिबाला पटेल यांना पक्षाची उमेदवारी रोखली गेली. संतप्त झालेल्या प्रीतिबाला पटेल यांच्या मनधरणीचा पाढा वाचला गेला. परंतु गुजराथी समाजाच्या मतांच्या गणिताची आकडेवारी लक्षात घेऊन रणांगणात लढणे पसंत करीत अपक्ष उमेदवारी केली. दुसरीकडे शिवसेनानेते संभाजीराजे पवार समर्थक छायाबाई शैलेश देसाई यांना उमेदवारी बहाल करून गुजराथी समाजाला संधी दिली, तर राष्ट्रवादीने सुप्रसिद्ध कपडा व्यापारी चंदा सोहनलाल दुगड यांना उमेदवारी देऊन जैन कार्ड टाकले. आता प्रीतिबाला पटेल किती ताकद लावतात आणि गुजराथी अथवा मारवाडी समाजाची किती मते खेचतात की देसाई अथवा दुगड यापैकी कोणाच्या विजयाचे गणित बिघडवतात हे प्रत्यक्ष मतदानातून कळेल. तोपर्यंत ही तिरंगी लढत चर्चेत येणार असल्याची चिन्हे आहेत. या प्रभागात कायम प्रभाव ठेवून असणारे पंकज पारख आणि नीलेश पटेल, भाजपाचे नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार सुशीलभाई गुजराथी, संभाजी पवार यांची सक्रि य मदत व त्यांची या प्रभागातील निर्णायक भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मारवाडी,गुजराथी समाजाची निर्णायक ९०० मते,यांची ध्रुवीकरणाची प्रक्रि या उमेद्वारच्या वातावरणानुसार बदलली जाणारी आहे.या प्रभागात असणारा मतदार हा येवला मर्चंट बँकेचा मतदार आहे.सुज्ञ ,सुशिक्षति मतदार असल्याने क्र ॉस मतदानाचा प्रयोग करण्याची त्यांची अभ्यासपूर्ण पद्धत विजयाच्या गणतिावर परिणाम करणारी आहे.कार्यकर्त्यांचे मोहळ असून चालत नाही.अंतिम टप्प्यात आर्थिक बाजू महत्वाची ठरते हाच मुद्दा निर्णायक विजय मिळवून देणारा ठरणार आहे.साळी गल्ली,देशपांडे गल्ली,हमाल गल्ली हा भाग विजयाच्या प्रक्रि येत महत्वाचा आहे.भाजप शहर अध्यक्ष आनंद शिंदे आण िमहिला आघाडीच्या प्रीतीबाला पटेल यांना या प्रभागातून भाजपच्या उमेदवारीवरून नगरसेवक पदावरून आउट व्हावे लागले आहे.हि घटना निवडणुकीचे गणति बिघडवते का? हे पाहण्यासाठी वाट बघावी लागेल.