शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

शहराला पुन्हा जोरदार पावसाने झोडपले; धुवाधार 'बॅटींग'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 19:43 IST

ढगांचा गडगडाटासह पावसाच्या मुसळधार सरी सुमारे पाऊणतास कोसळल्याने शहरातील उंचसखल भागात पाण्याचे तळे साचल्याचे चित्र पहावयास मिळाले.

ठळक मुद्देचौकाचौकात साचले तळे २० दिवसांत ९१ मि.मी पाऊस

नाशिक : शहर व परिसरात बुधवारी (दि.२१) अचानकपणे ढगांचा गडगडाट अन‌् वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावासाला सुरुवात झाली. सुमारे ४५ मिनिटे पावसाच्या दाट सरी जोरदार कोसळल्या. पावासाने केलेल्या धुवाधार बॅटींगमुळे चौकाचौकात पाण्याचे तळे साचले होते. त्यामुळे नागरीकांची धावपळ उडालीअरबी समुद्रात नव्याने तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यासह उत्तर महाराष्ट्रात परतीच्या पावासाची जोरदार हजेरी सुरु आहे. मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास शहरासह उपनगरांमध्ये सुमारे वीस मिनिटे जोरदार पाऊस झाला. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मागील २४ तासांत २मि.मी पाऊस झाला. मंगळवारी दिवसभर सरींचा वर्षाव झालेला नव्हता. बुधवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ हवामान कायम होते. अधुनमधुन सुर्यप्रकाशही पडत होता; मात्र वातावरणात कमालीचा उष्मा वाढल्याने दुपारी दीड वाजता शहरात पावसाने वर्दी दिली. शहराच्या मध्यवर्ती भागासह वडाळागाव, इंदिरानगर, गंगापूरोड, महात्मानगर, पंचवटी आदी भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानकपणे आलेल्या जोरदार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाचा वेग इतका जास्त होता की रस्त्यावरचे काहीही दिसत नव्हते. ढगांचा गडगडाटासह पावसाच्या मुसळधार सरी सुमारे पाऊणतास कोसळल्याने शहरातील उंचसखल भागात पाण्याचे तळे साचल्याचे चित्र पहावयास मिळाले. मायकोसर्कल, टिळकवाडी, तरणतलाव सिग्नल, जुना गंगापूरनाका आदी भागात पाणी साचले होते. शहरातील मध्यवर्ती भागातील वीजपुरवठाही खंडीत झाला होता. 

संध्याकाळपर्यंत रिपरिपशहरात बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. दुपारी पाऊणतास जोरदार सलामी दिल्यानंतरही पावसाची रिपरिप संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरुच होती. यामुळे जनजीवन काहीसे प्रभावीत झाले.-

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसweatherहवामान